वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी एका पक्षाच्या अध्यक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 09:44 PM2020-06-23T21:44:20+5:302020-06-23T21:57:42+5:30
शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे.
उत्तम काळे
भुसावळ : शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र एका पक्षाच्या अध्यक्षाने कोरोनासंदर्भात शॉप दिले असतानाही वाढदिवस साजरा करून तब्बल ३० ते ३० कार्यकर्त्यांना अडचणींमध्ये आणले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
येथील एका पक्षाच्या अध्यक्षांचा २० रोजी वाढदिवस होता. मात्र त्या पदाधिकाऱ्यांनी १८ रोजी कोरोनासंदर्भात तपासणी करून स्वॅप तपासणीसाठी पाठवले होते. तरीही तपासणीनंतर संबंधित पदाधिकाºयाने परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी ४०-५० कार्यकर्ते जमा केले. कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता वाढदिवस उत्साहात साजरा केला . वैद्यकीय अधिकारी व पोलीस प्रशासनाने त्या पदाधिकाºयांची तपासणी केली असतानाही वाढदिवस करीत असताना त्याच्या कार्यक्रमाला मज्जाव केला नाही.
रात्रीच्या वेळेस परिसरात वाढदिवस साजरा झाल्यानंतर दुसºयाच दिवशी २१ रोजी त्या पदाधिकाºयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला व परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने २२ रोजी त्या कार्यक्रमात कोण, कोण सहभागी होते त्यांची चौकशी केली. छायाचित्रावरून तब्बल ३० ते ४० कार्यकर्त्यांची तपासणी करून त्यांचे स्वॅप तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातून देण्यात आली आहे.
दरम्यान, शहरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच दोन ठिकाणी ओल्या पार्ट्या करण्यात आल्याचेही प्रकरण उघडकीस आले होते. एका पार्टीमध्ये नगरसेवक, तर एका पार्टीत प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते व त्यात वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा झाल्यामुळे नागरिक चकीत झाले आहेत.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तब्बल १३ ते १४ पोलीस कर्मचाºयांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एका कर्मचाºयाचा मृत्यू झाला आहे, तर इतर योद्ध्यांनी कोरोनावर मात केली आहे, अशी परिस्थिती असतानाही राजकीय पक्षांचे पदाधिकारी मात्र वाढदिवस व ओल्या पार्ट्या साजरे करत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.