सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी सुकाणू समितीतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:44 PM2017-10-21T12:44:38+5:302017-10-21T12:47:08+5:30
शेतकरी आत्महत्येस सरकार जबाबदार असल्याचा आरोप
ऑनलाईन लोकमत
चोपडा, जि. जळगाव, दि. 21 - शेतकरी कृती समिती आणि सुकाणू समिती यांच्यातर्फे राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी चोपडा शहर पोलीस स्थानकात 20 रोजी निवेदन देण्यात आले.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या प्रमाण अधिक वाढले असून शेतमालाचे झालेले मातीमोल बाजारभाव, नोटाबंदी आणि जीएसटी, निर्यात बंदी असून या समस्यांनी शेतकरी आत्महत्या करीत आहे, असल्याचे समितीचे म्हणणे आहे. सरकारने कर्जमाफीचा फसवा निर्णय घेतल्याने शेतक:यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करीत आहे . शेतक:यांना सरसकट कर्जमाफी करून स्वामीनाथन आयोग लागू केला असता तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या म्हणून सरकार या सर्वांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरी आत्महत्या सरकार जबाबदार असल्याने सरकारवर 302, 306, 420 नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना देण्यात आले.
सर्वप्रथम पोलीस स्टेशन समोर बळीराजाचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक आणि सुकाणू समिती सदस्य एस. बी. पाटील, संजीव सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, धनंजय पाटील, अनिल वानखेडे, प्रकाश पाटील, प्रमोद बोरसे, कुलदीप पाटील, आरिफ सिद्दीकी, अॅड. एस. डी. सोनवणे, भगवान फकिरा पाटील, उदय पाटील, कुलदीप पाटील, रमाकांत सोनवणे, बंटी पाटील, तय्यब बागवान, सूतगिरणी संचालक समाधान पाटील, अजित पाटील, विनायक सोनवणे, दत्तात्रय चौधरी, संदीप पाटील, वसंत पाटील, रवींद्र निकम, भगवान पाटील, युनूसअली कुतुब अली, डॉ.सुभाष देसाई आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी असून निवेदन देतेवेळी हजर होते.