वैजनाथ येथील वाळू उपशाच्या अहवालात ‘गोलमाल’चा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:27 PM2018-04-03T13:27:58+5:302018-04-03T13:27:58+5:30

ठेका रद्दची नोटीस

 In the report of the sand rush in Vaishnath, Golmaal suspects | वैजनाथ येथील वाळू उपशाच्या अहवालात ‘गोलमाल’चा संशय

वैजनाथ येथील वाळू उपशाच्या अहवालात ‘गोलमाल’चा संशय

Next
ठळक मुद्दे अहवालात दाखविले किरकोळ अटींचे उल्लंघननवीन अहवालात जुनेच मुद्देशासनाचा महसूल बुडविला

जळगाव : अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचा संशय आल्याने मोजणी करण्यात आली. वैजनाथ वाळू ठेक्याचा अहवाल मात्र मोजणी करणाºया अधिकाºयांनी ‘गोलमाल’ केला असून केवळ किरकोळ अटींचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे दर्शविले आहे.
या अहवालावरून संबंधीत ठेकेदाराला वाळू ठेका रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र तो देखील निव्वळ फार्स ठरण्याची शक्यता आहे.
गिरणा नदीपात्रातील एरंडोल तालुक्याच्या हद्दीतील वैजनाथचा वाळू गट क्र.१११ ते ११३ चा ठेका धनराज घुले रा. पांढरे प्लॉट, पिंप्राळा यांना दिला असून संबंधीत ठेकेदारही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करीत असून रात्रंदिवस वाळू वाहतूक करणारी वाहने रामानंदनगर रस्त्यावरून भरधाव ये-जा करीत असतात. दरम्यान २१ मार्च रोजी शनिवारी अपर जिल्हाधिकाºयांनी पुन्हा अचानक भेट दिली असता नदीपात्रात ठेक्याच्या क्षेत्राबाहेर खड्डे आढळून आले. त्यामुळे या ठेक्याची मोजणी उपअधिक्षक भूमिअभिलेख, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांताधिकारी व तहसीलदार एरंडोल यांनी केली होती. तर वरिष्ठ भू-वैज्ञानिक प्रतिनिधी मात्र गैरहजर होते. हा मोजणी अहवाल सोमवार, २ एप्रिल रोजी जिल्हाधिकाºयांना सादर झाला. त्यात हा मक्ता २०७८ ब्रासचा असताना या ठिकाणी एकूण ८६३.१४ ब्रास वाळू खोदकाम झाले असल्याचेच अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्वत: अपर जिल्हाधिकाºयांनी पाहणी केल्यानंतर मोजणी होऊनही अहवाल गोलमाल झाला असल्याची चर्चा आहे.
उपसा झाला तेवढ्या वाळू साठ्याच्या पावत्याही फाडल्या गेल्या आहेत का? याची तपासणी होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
नवीन अहवालात जुनेच मुद्दे
सावखेडा ग्रा.पं.ने केलेल्या तक्रारीवरून या ठेक्याची मोजणी जानेवारी महिन्यात केली होती. तो अहवालही अधिकाºयांनी हातमिळवणी करून गोलमाल केला असल्याचीचर्चाआहे. त्या अहवालातील मुद्देच २७ मार्च २०१८ रोजीच्या मोजणीबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. एखादा मक्तेदार जर त्याच-त्याच अटींचे उल्लंघन वारंवार करीत असतानाही अधिकारी मात्र केवळ नाममात्र दंड आकारून डोळेझाक करतात, याचा अर्थ काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
शासनाचा महसूल बुडविला
सावखेडा ग्रा.पं.कडूनच अनेकदा तक्रारी झाल्याने यापूर्वी दोन वेळा या ठेक्याची मोजणी झाली आहे. त्यात मागील मोजणीच्यावेळी ठेक्याच्या क्षेत्राबाहेर नदीपात्रात वाळू उपसा केल्याचे व रात्रीतून जेसीबीने खड्डे सपाट करून टाकल्याचे आढळून आले. मात्र अधिकाºयांची ठेकेदाराशी हातमिळवणी असल्याने त्यावेळीही अहवाल गोलमाल करून अवैध उपसा न दाखविता इतर अटींशर्र्तींचा भंग झाल्याने २ लाख ८२ हजारांचा दंड करण्यात आला. नवीन वाळू धोरणानुसार अवैध वाहतूक करणाºया एका वाळूच्या ट्रकला जेवढा दंड होईल,तितका दंड या मक्तेदाराला करून शासनाचा महसूल बुडविण्याचे काम झाले.
काय म्हटले आहे अहवालात...
सीमांकनाबाहेर उपसा करण्यात आला आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने ठरवून दिलेल्या ०.५ मीटर खोलीपेक्षा जास्त म्हणजे २ ते ३ मीटर खोदकाम करून वाळू उपसा केला आहे.
मोजणी वेळी ठेक्याच्या आखून दिलेल्या सीमा आढळून आल्या नाहीत.
वाळू वाहतूक करताना ताडपत्री झाकली जात नाही.
४हरीत पट्टा विकसित केला नाही.
----------
वैजनाथ वाळू ठेका रद्द करण्याची मागणी
एरंडोल तालुक्यातील वैजनाथ नदीपात्रातील वाळू उपसा शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा ज्यादा प्रमाणात केल्याने वाळू ठेका रद्द करण्याची मागणी बहुजन रतय परिषदेतर्फे प्रदेश उपाध्यक्ष ए.एम. बाविस्कर यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या ठेकेदाराला पाठीशी घालणाºया अधिकाºयांवर कारवाईची मागणीही केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Web Title:  In the report of the sand rush in Vaishnath, Golmaal suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.