आरोग्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही ३८६ संशयितांचे अहवाल प्रलंबितच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:00 PM2020-06-18T12:00:01+5:302020-06-18T12:00:55+5:30

आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार : स्क्रिनिंग झालेल्या संशयित रुग्णाची संख्या लाखांवर, चाचण्या मात्र १२ हजार,फक्त दहा टक्केच कामकाज

Reports of 386 suspects are pending even after Health Minister's intervention! | आरोग्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही ३८६ संशयितांचे अहवाल प्रलंबितच !

आरोग्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही ३८६ संशयितांचे अहवाल प्रलंबितच !

Next

जळगाव : तपासण्या वाढविल्या म्हणून रुग्ण संख्या वाढल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात येत होता़ मात्र, या तीन महिन्यांच्या कार्यकाळात केवळ ११ हजार ६४५ जणांचीच कोरोना चाचणी झाल्याची आकडेवारी प्रशासनानेच जाहीर केली आहे़ स्क्रिनींग १ लाख ३३ हजारांवर झाली असली तरी चाचण्या मात्र, केवळ दहा टक्केच लोकांच्या करण्यात आलेल्या आहेत़ दुसरीकडे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगूनही तपासणी अहवाल २४ किंवा ४८ तासात मिळत नाही. बुधवार अखेरपर्यंत किमान ३८६ तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दि.३ रोजी आठ तासाच्या मॅरेथॉन बैठकीत झाडाझडती घेत लॅब उपलब्ध असल्याने २४ तास आणि जास्तीत ४८ तासात तपासणी अहवाल मिळायला हवे, अशी तंबी दिली होती. यानंतर अहवाल मिळण्यास अडचण येत आहे. जोपर्यंत संबंधिताचा अहवाल येत नाही, तोपर्यत रुग्ण आणि नातेवाईकही चिंतेत असतात.

यामुळे कोरोनाची तपासणी निकषात अडकल्याचे चित्र आहे़
जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अगदीच झपाट्याने रुग्ण वाढले होते़ त्या प्रामुख्याने अमळनेरात सुरूवातीला अगदीच विस्फोट झाला होता़ मात्र, मध्यंतरी या भागात रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाली होती़ तेव्हा अमळनेर पॅटर्न चर्चेत आला. मात्र, पुन्हा या भागात कोरोनाने डोके वर काढले असून रोज रुग्ण आढळत असल्याचे समोर येत आहे़
जळगाव शहरातही अनेक कन्टेमेंट झोनमध्ये चौदा दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीनंतरही रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे़ यात सालारनगरात बाधित वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर महिनाभराने या भागात रुग्ण आढळून आला़ यासह अनेक असे भाग आहेत, त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने रुग्ण आढळून आले़ त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़

१५ टक्के रुग्ण बाधित
लोकसंख्येच्या मानाने तीन महिन्यात ०़२७ टक्के लोकांची कोरोना तपासणी जिल्ह्यात करण्यात आली आहे़ त्यातही जेवढ्या तपासण्या झालेल्या आहेत़ त्यापैकी १५ टक्के रुग्ण बाधित आढळून आलेले आहेत़

प्रमाणपत्रांमुळे नोंद अधिक
अनेकांना प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागत असल्यामुळे स्क्रिनींग करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे़ घरोघरी जावूनही वैद्यकीय पथके लक्षणे तपासणी करीत आहेत, मात्र, एक रुग्ण बाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील अनेक जण विना लक्षणांचे बाधित आढळत आहेत़ शहरात तपासणी पूर्ण झालेल्या भागातही असे रुग्ण आढळून आले आहेत़ त्यामुळे कोरोनाची चाचणी सरसकट होण्याचा सूर उमटत आहे़
 

Web Title: Reports of 386 suspects are pending even after Health Minister's intervention!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.