जळगाव जिल्ह्यातील सहा ठिकाणच्या कोंबड्यांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:17 AM2021-02-09T04:17:43+5:302021-02-09T04:17:43+5:30
जळगाव : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू बाबत खबदारी म्हणून पाच ठिकाणच्या कोंबड्यांना तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या कोंबड्यांचे ...
जळगाव : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू बाबत खबदारी म्हणून पाच ठिकाणच्या कोंबड्यांना तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या कोंबड्यांचे गेल्याच आठवड्यान निगेटिव्ह अहवाल आले आहेत. यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू नसल्याचा दावा यंत्रणेने केला आहे. मात्र, खबरदारी म्हणून योग्य त्या उपायोजना राबविल्या जात असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील चिंचपुरा ता. धरणगाव, जळू ता,एरंडोल, मनवेल ता,यावल, जळगाव, बहाळ ता,चाळीसगाव आणि जामनेर या ठिकाणच्या साधारण वीस ते पंचवीस कोंबड्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. दरम्यान, नवापूरात सहकार्य म्हणून जळगावच्या पशुसंवर्धन विभागाकडून १६ टीम पाठविण्यात आल्याची माहिती जि. प. पशुसंवर्धन अधिकारी एम. इंगळे यांनी दिली. जिल्ह्यात ३९० पोल्ट्री फॉर्म आहेत. त्या ठिकाणी विभागाचे डॉक्टर, कर्मचारी यांनी जावून मार्गदर्शन केले आहे. पाहणी करण्यात येत असून सर्व खबरदारी बाळगली जात असल्याचे श्यामकांत पाटील यांनी सांगितले.