चिनावल येथील वैकुंठवासी दिगंबर महाराज संस्थानची प्रातिनिधिक दिंडी पंढरपूरला अखेर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:15 PM2020-06-29T15:15:39+5:302020-06-29T15:16:43+5:30
खानापूर येथील श्रीराम मंदिरापासून वैकुंठवासी दिगंबर महाराज पायी वारी दिंडी सोहळ्याचे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात प्रस्थान झाले.
रावेर : तालुक्यातील चिनावल येथील वैकुंठवासी दिगंबर महाराज संस्थानच्या खानापूर येथून प्रस्थान होणाºया श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडीला शासनाने संत मुक्ताई पायी वारी दिंडी सोहळ्यासोबत प्रातिनिधिक स्वरूपात परवानगी दिल्याने, आज खानापूर येथील श्रीराम मंदिरापासून वैकुंठवासी दिगंबर महाराज पायी वारी दिंडी सोहळ्याचे टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात प्रस्थान झाले.
यंदा या श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळ्याचा हा तिसरा तपपूूर्ती सोहळा कोरोनाच्या अनलॉकमध्येही तोही मानाच्या संत मुक्ताई पायी वारीसोबत पार पडत असल्याचा वारकरी संप्रदायाने आत्मानंद व्यक्त केला.
चिनावल येथील वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य दिगंबर महाराज यांनी रोवलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळ्याला ३५ वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे.
हभप दुर्गादास महाराज खिरवडकर व दिंडी चालक विणेकरी हभप भगवंत महाराज यांच्या नेतृत्वाखाली टाळ मृदंगाच्या निनादात व हरिनामाच्या गजरात आज या पायी दिंडी वारी सोहळ्याचे खानापूर येथील श्रीराम मंदिरापासून प्रस्थान झाले. या पायी वारी दिंडी सोहळ्याला श्री क्षेत्र पंढरपूर येथील वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य दिगंबर महाराज वारकरी संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची या प्रस्थान सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली.
श्रीराम मंदिरापासून थेट खानापूर बसथांब्यावर हा दिंडी सोहळा पोहचल्यावर खासगी वाहनाद्वारे हा दिंडी सोहळा चिनावल येथील वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य दिगंबर महाराज यांच्या समाधीस्थळाचे व हंबर्डी येथील हभप विठ्ठल महाराज यांच्या समाधीस्थळावर सुपूजन करून आदिशक्ती श्री संत मुक्ताई पायी वारी दिंडी सोहळ्याचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान होणाºया दिंडीत ही प्रातिनिधिक दिंडी संम्मेलीत होणार आहे. वैकुंठवासी निष्ठावंत वारकरी गुरूवर्य दिगंबर महाराज संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे हे या पायी वारी दिंडी सोहळ्याची ध्वजपताका घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळ्यात रवाना झाले आहे.