जळगाव जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्रणा नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:50 PM2018-07-07T12:50:01+5:302018-07-07T12:51:40+5:30
रुग्णांचे हाल
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. दुरुस्तीबाबत तंत्रज्ञास कळविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
वारंवार कोणत्या न कोणत्या समस्या उद्भवणाऱ्या जिल्हा रुग्णलायात आता सोनोग्राफी मशिन बंद पडलेले आहे. जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांची आर्थिक स्थिती बिकट असते. त्यात आता सोनोग्राफी होत नसल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यात वेळेवर सोनोग्राफी झाले नाही तर गंभीर प्रसंग ओढावू शकतो, अशी भीती रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रसूती कक्षामध्येही झाले हाल
दोन दिवसांपूर्वी प्रसूती कक्षामध्ये एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने दाखल झालेल्या अनेक गर्भवती महिलांचे ‘सिझर’ होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना औरंगाबाद, धुळे येथे पाठवावे लागले होते.
जिल्हा रुग्णालयात असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञांपैकी काही जण सुट्टीवर जाण्यासह एका वैद्यकीय अधिकाºयांनी राजीनामा दिला. त्यामुळे बुधवारी प्रसूती कक्षात एकच वैद्यकीय अधिकारी होत्या. त्यात प्रसूतीसाठी दाखल महिलांची संख्या जास्त असल्याने त्यातील काहींचे सिझर करावे लागणार होते. एकच अधिकारी असल्याने एवढ्या महिलांचे सिझर होऊ शकत नव्हते. त्यामुळे अखेर काही महिलांना औरंगाबाद, धुळे येथे पाठवावे लागले होते.
प्रसूतीसाठी दाखल करण्यात येणा-या महिलांमधील काहींचे तिसरे अथवा त्यापेक्षा जास्त वेळाचे सिझर असते. त्यामुळे त्यांना ‘हायर सेंटर’ला पाठवावे लागते, असे सांगण्यात आले. त्या पाठोपाठ आता सोनोग्राफी होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे सोनोग्राफी मशिन बंद आहे. या बाबत तंत्रज्ञास कळविले असून लवकरच दुुरुस्ती होईल.
- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता.