जळगाव तालुक्यात ग्रा.पं.आखाड्यात सरपंच पदासाठी प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 09:53 PM2017-10-02T21:53:13+5:302017-10-02T21:56:50+5:30

जळगाव तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यंदा पहिल्यांदाच सरपंचपदाचीनिवडणूक ही थेट नागरिकांमधूनच होणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.

Reputation for the post of Sarpanch in Gram Panchayat in Jalgaon taluka | जळगाव तालुक्यात ग्रा.पं.आखाड्यात सरपंच पदासाठी प्रतिष्ठा पणाला

जळगाव तालुक्यात ग्रा.पं.आखाड्यात सरपंच पदासाठी प्रतिष्ठा पणाला

Next
ठळक मुद्देडिजीटल प्रचारावर भर ७ आॅक्टोबर रोजी मतदानमंगळवारपासून प्रचाराची रंगत

आॅनलाईन लोकमत ,  अजय पाटील

जळगाव, दि.२-तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यंदा पहिल्यांदाच सरपंचपदाचीनिवडणूक ही थेट नागरिकांमधूनच होणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील सावखेडा खु. येथील सरपंच व सदस्यांची निवड ही बिनविरोध झाली आहे. तर वराड बु. येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील ९ गावांमध्ये सरपंच पदासाठी अनेकांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. 

किनोद येथे फक्त सरपंचपदासाठी मतदान होणार
किनोद ग्रामपंचायतीच्या आठ जागा या बिनविरोध झाल्या आहेत. या ठिकाणी केवळ सरपंच पदासाठी  मतदान होणार असून,  प्रियंका प्रवीण सूर्यवंशी व सुमाबाई सुनील चौधरी यांच्यात लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडले असून, गावात जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही उमेदवार एकाच समाजातील असल्याने अल्पसंख्याक समाजाच्या मतांवर खरी मदार असल्याचीमाहितीमिळाली.

भादली खु.येथे ५ जागांसाठी होणार मतदान
सात पैकी २ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ५ जागांसाठी ७ आॅक्टोबरला मतदान  होणार आहे. सरपंच पदासाठी एस.टी.प्रवर्गाची जागा राखीव होती. मात्र यासाठी गावात कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल नसल्याने सरपंच पदासाठी निवडणूक होणार नाही.  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत हिंमत पाटील व शेतकी संघाचे संचालक नाना आत्माराम पाटील या दोघांमध्ये अती-तटीची लढत आहे. या लढतीवर सर्व तालुक्याची नजर आहे. 

वसंतवाडी येथे 5 जागांसाठी मतदान
येथील ग्रामपंचायतीच्या १० जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ५ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये ४ सदस्यांचा समावेश आहे. तर सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात असून यामध्ये  वत्सलाबाई आधार पाटील व  दुर्गाबाई भिका चव्हाण या महिला उमेदवारांमध्ये सरळ लढत आहे. 

जळके
ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ६ जागाबिनविरोध झाल्या आहेत.  एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहे. तर सरपंच पदासाठी सुमनबाई वामन मोरे व मुन्नीबाई अजीज तडवी यांच्या सरळ  रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून मंगळवारी प्रचाराचे नारळ फोडणार येणार आहे. 

इन्फो-
मंगळवारपासून प्रचाराची रंगत
ग्राम पंचायतीच्या निवडणुका असल्या तरी या निवडणुकांमध्ये देखील  उमेदवारांकडून डिजीटल प्रचारावर भर दिला जात आहे. सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांकडून अनेक व्हॉट्सअ‍ॅप गृप तयार करण्यात आले असून, त्याव्दारे आपला जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. तालुक्यातील कुवारखेडे, विदगाव, घार्डी, सुजदे-भोलाणे  या गावांमध्ये देखील ग्राम पंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराने वातावरण तापू लागले आहे. 

Web Title: Reputation for the post of Sarpanch in Gram Panchayat in Jalgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.