स्वत:चे यकृत देऊन वाचविले कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:56 AM2019-09-11T11:56:06+5:302019-09-11T11:57:28+5:30
मुंबईत दुर्मिळ शस्त्रक्रीया यशस्वी: समाजासमोर आदर्श
जळगाव : स्वत:चे कुंकू वाचविण्यासाठी कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी, एक महिला खूप मोठा त्याग करू शकते, याचीच प्रचिती जळगावात आली़ स्वत:चे यकृत पतीला दान करून शारदा अनिल केºहाळे यांनी समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे़ त्यांची प्रचंड इच्छाशक्ती, डॉक्टरांचे परिश्रम व यश, सामाजिक घटकांकडून मिळालेले सहकार्य या सर्व बाबी जुळून आल्याने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनिल केºहाळे यांची मरणयातनेतून सुटका झाली. त्यांना नवजीवन मिळाले आहे़़
अनिल केºहाळे हे दोन मुले व पत्नीसह जळगावात स्थित आहे़ दोन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता़ औरंगाबादच्या तपासणी केली असता त्यांना या आजाराचे निदान झाले व मुंबईत जाण्याचा सल्ला देण्यात आला. यकृत खराब झाल्याचे कळाल्यावर केºहाळे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी मुंबई, पुणे, हैद्राबाद, अशा अनेक ठिकाणी यकृतासाठी अर्ज केले़ मात्र हाती काहीही लागले नाही़ पती व परिवारावरीले संकट दूर सारण्यासाठी पत्नी शारदा यांनी धाडसाचे पाऊल उचलत यकृतदान करण्याचा निर्णय घेतला़ यासाठी मुंबईतील केºहाळे यांच्या सहकारी मिनल पटेल यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला़
सोशल मीडियाने जोपासली सामाजिक बांधिलकी
तब्बल २२ लाखांचा खर्च या शस्त्रक्रियेला आला़ अशा स्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या केºहाळे परिवाराच्या मदतीला अनेक हात धावून आलेत़ यात भवरलाल जैन ट्रस्ट, बाफना ट्रस्ट, साई ट्रस्ट, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आजी माजी पदाधिकारी, काही मंत्र्यांकडून त्यांना मदत मिळाली़ यासह सोशल मीडियावर मित्रमंडळींच्या माध्यमातून झालेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी त्यांना मदत केली़ सोशल मीडियातून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली गेली़ गरीब रूग्णांना अशा अत्यंत खर्चिक शस्त्रक्रिया शासकीय योजनांमध्ये व्हाव्यात, अशी अपेक्षा केºहाळे दाम्पत्याने केली आहे़
१८ तासांची अवघड शस्त्रक्रिया
शारदा व अनिल केºहाळे रूग्णालयात दाखल झाले़ २ जुलै रोजी ही अवघड व दूर्मिळ शस्त्रक्रिया झाली़ यात सर्वात आधी शारदा यांच्यावर १५ तास शस्त्रक्रिया झाली त्यानंतर यकृत अनिल यांना बसविण्यासाठी १८ तासांची जिकरीची शस्त्रक्रिया झाली़ तीन दिवस दोघेही बेशुद्ध होते़
अवयवदान होणे गरजेचे
अवयवदानाने कुणाचाही जीव वाचू शकतो, याचे महत्त्व व यासंदर्भातील लोकांचे गैरसमज दूर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे़ त्यामुळे अवयवदान करावेच, लोकांनी यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे़ मागणी मोठ्या प्रमाणात असताना दाते लवकर उपलब्ध होत नाहीत, अशा स्थितीत अवयवदानाचे प्रमाण वाढावे व जीव वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केºहाळे दाम्पत्याने केले आहे़