जळगावातील विद्यार्थ्यांकडून सीआरसीएस सॉफ्टवेअरचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 05:20 PM2018-05-23T17:20:12+5:302018-05-23T17:20:12+5:30
जमिनी घटकांनुसार नवीन पिके कोणती घ्यावी, जमिन कशी कसावी, हवामान शेती उपयुक्त आहे का?, कोणते बियाणे व खते शेतीसाठी वापरावे यास विविध शेती उपयुक्त माहिती व सल्ला देणारे सीआरपीएस सॉफ्टवेअर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले आहे़
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१६ : जमिनी घटकांनुसार नवीन पिके कोणती घ्यावी, जमिन कशी कसावी, हवामान शेती उपयुक्त आहे का?, कोणते बियाणे व खते शेतीसाठी वापरावे यास विविध शेती उपयुक्त माहिती व सल्ला देणारे सीआरपीएस सॉफ्टवेअर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले आहे़
एसएसबीटी महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या चौथ्या वर्षाच्या दीपक कटावे, कार्तिक थोरात, अक्षय मोरे, तसेच हेमंत चौधरी या विद्यार्थ्यानी हे सॉफ्टवेअर तयार केले आहे़ त्यासाठी डॉ़ मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे़ सॉफ्टवेअर प्रकल्पाचे नाव सीआरसीएस म्हणजेच क्रॉप रेकमेंडेशन, सजेशन सिस्टीम असे असून हा एक वेब प्लॅटफॉर्म असणार आहे़
असा आहे फायदा
प्रकल्पातून शेतजमिनीच्या मृदा प्रकार, पीएचनुसार योग्य ती पिके व त्यांच्या सुयोग्य वाढीसाठी आवश्यक ती खते, किटकनाशके, बियाणे आणि लागवडीपासून ते शेतीपासून मिळणारा माल पूर्णपणे तयार होईपर्यंतच्या प्रक्रियेवर मागदर्शन होणार आहे़ एवढेच नव्हे तर जर शेतकऱ्यांना अपारंपारिक, नवे पीक घ्याचे असेल जे त्याच्या शेतजमिनीनुसार आणि हवामानानुसार योग्य आहे की नाही याचे मार्गदर्शन या प्रकल्पाद्वारे शेतकºयांना केले जाईल़
तज्ज्ञांचे लाभले मार्गदर्शन
जमीन व मृदा तसेच पिकांसाठी ही प्रणाली विकसित करत असताना विद्यार्थ्यांना कृषी व कृषी संशोधन विभागातील तज्ज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले़ या प्रकल्पामुळे शेतकºयांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीत सुध्दा बदल घडून येईल.