संशोधन : पाच पटीची गुणवत्ता व सुरक्षित असलेल्याबॅटरीचा लावला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:45 AM2018-10-16T06:45:24+5:302018-10-16T06:45:49+5:30
पिंपळनेरचा गौरव युरोच्या पुरस्कारांने सन्मानित
पिंपळनेर : वारवांर बॅटरीचे होणारे स्फोट ही अनेक क्षेत्रातील सुरक्षित विद्युतीकरणाची मोठी अडचण झाली आहे़ त्याच्यावर उपाय म्हणून सध्याच्या बॅटरी सेपेरेटर्सपेक्षा पाच पटीची गुणवत्ता आणि स्वस्त असलेला सेपेरेटर पिंपळनेरच्या गौरव बिरारीने विकसीत केला. या संशोधनाबद्दल त्याचा ओरेनबर्ग मिररल्स या रशियन संस्थेने १० हजार युरो रक्कमेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सध्याच्या काळात इलेक्ट्रानिक वाहने, सौर व पवन उर्जा, स्मार्ट फोन, अवकाश संशोधन अशा तंत्रज्ञानाचा वाढत्या व्यापारीकरणामुळे येणाऱ्या काळात लिथियम आर्यन बॅटरीला खूप महत्व राहणार आहे़ वारवांर बॅटरीचे होणारे स्फोट ही अनेक क्षेत्रातील सुरक्षित विद्युतीकरणाची मोठी अडचण झाली आहे़ प्रत्येक बॅटरीत सेपेरेटर हा महत्वाचा घटक असतो़ यात आघात, टक्कर, उष्णता, ओव्हरचार्जीग अशा कारणाने सेपरेटर तुटतो आणि शॉर्ट सर्किट होऊन बॅटरीचा स्फोट होतो़ सेपरेटर हे पॉलिमर किंवा कंपोझिटचे बनलेले असते़ जे सध्या आघातामुळे देखील खराब होऊ शकते़ आणि त्यांचा स्फोट झाल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यावर उपाय शोधून काढत पिंपळनेरच्या गौरव बिरारीने सुरक्षित आणि जास्त काळ चालणारे बॅटरी सेपरेटरचा अविष्कार केला. तो त्याने शोध लावले सेपरेटर्स हे संशोधक ओरेनबर्ग मिनरल्स या रशियन संस्थेला उपयोगी ठरल्याने या संस्थेने १० हजार युरो रक्कमेचा पुरस्कार देऊन गौरवचा सन्मान केला आहे़ भारतीय चलनानुसार गौरवला आठ लाखांचा पुरस्कार मिळाला आहे़ यापूर्वी गौरवने बॅटरी रेपरेटवर एस़ के़ गृ्रप (दक्षिण कोरीया) आय़सी़एलग़ृ्रप यांच्यावतीने संशोधन प्रकल्प राबविला आहे.
अभ्रकावर संशोधन- ओरेनबर्ग मिनरल्स ही अभ्रक खजिनावर काम करणारी रशियन संस्था आहे. मात्र सध्या अभ्रकात मंदी आल्याने त्यावर उपाय म्हणून अभ्रकावर नवीन संशोधन तसेच परिक्षण करण्याचा उद्देश या अरेनबर्ग मिनरल्स संस्थेचा आहे. अभ्रकांची गुणवत्ता अधिक वाढून त्याचा व्यवसायाला कसा उपयोग होइर््ल़ यासाठी पिंपळनेरचा गौरव रशियन संस्थेसाठी संशोधक म्हणून काम करीत आहे.
गौरव बिरारीस हे पिंपळनेर येथील संशोधक आहेत संशोधनाची आवड असल्याने त्यांनी कल्पसृष्टी नावाने संशोधन सेवा सुरू केली आहे़ गौरवला आतापर्यत विविध देशातील ९ पुरस्कारांनी सन्मानित कण्यात आले आहे़ गौरव हा जि़प़शाळेच्या शिक्षिका ललिता बिरारी व सेवानिवृत्त शिक्षक एस़आऱ बिरारीस यांचा मुलगा आहे़