संशोधकाने तयार केला जादुई पाण्याचा देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:02 AM2018-09-10T00:02:44+5:302018-09-10T00:05:06+5:30
पाचोरा येथील युवा संशोधक पुरस्कार प्राप्त योगेश नथ्थु बारी या युवकाने गणेश भक्तासाठी जादुई पाण्याच्या नळाचा देखावा साकारला आहे. गणेश भक्तांमध्ये या देखाव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आत्माराम गायकवाड
खडकदेवळा, ता.पाचोरा - पाचोरा येथील युवा संशोधक पुरस्कार प्राप्त योगेश नथ्थु बारी या युवकाने गणेश भक्तासाठी जादुई पाण्याच्या नळाचा देखावा साकारला आहे. गणेश भक्तांमध्ये या देखाव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पाचोरा येथील योगेश नथ्थु बारी यांनी यावर्षी गणेश भक्तांसाठी जादुई देखावा सादर केला आहे. त्यांनी वाहते पाणी हे नळाद्वारे सतत खाली पळतांना दाखविले आहे. मात्र या नळाला पाणी येण्यासाठी कुठलाही आधार दिसत नाही. या जादुई नळातुन पाणी निघत असल्याने तो चर्चेचा विषय ठरणार आहे. गणेश मंडळांकडून आरास तयार करताना थर्माकोल ,प्लॅस्टिक, कागदी पिशवी यांचा वापर केला जातो. त्यामुळे विसर्जनावेळी या कचऱ्याची विल्हेवाट लावताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे बारी यांनी हा पर्यावरण पुरक असा जादुई पाण्याच्या नळाचा देखावा सादर केला आहे. हा देखावा गणेश भक्तांसाठी कुतुहलाचा विषय ठरणार आहे.