जळगाव जिल्ह्यात हायड्रोकार्बन साठ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 01:10 PM2018-12-04T13:10:15+5:302018-12-04T13:10:32+5:30

जळगाव व पाचोरा तालुक्यातील गाळयुक्त खोऱ्यात दिल्लीचे पथक

Researchers of hydrocarbon reserves | जळगाव जिल्ह्यात हायड्रोकार्बन साठ्यांचा शोध

जळगाव जिल्ह्यात हायड्रोकार्बन साठ्यांचा शोध

Next
ठळक मुद्देबोअरिंग करुन जमिनीतील घटक द्रव्यांचे संकलन

सचिव देव
जळगाव : आगामी काळात परदेशातून होणारी खनीज तेलाची आयात कमी व्हावी व भारतात देखील विविध खनिज तेलांचे साठे निर्माण व्हावेत, यासाठी केंद्र शासनातर्फे देशभरात भूगर्भ तज्ञांकडून हायड्रोकार्बन साठ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातही जळगाव व पाचोरा तालुक्यातील काही गावांच्या गाळयुक्त खोºयांमध्ये भूगर्भ तज्ज्ञ दाखल झाले आहेत.
सोमवारी सकाळपासूनच सॅटेलाईट केबलच्या माध्यमातून हायड्रोकार्बन साठ्यांचा शोध घेतला. यासाठी ठिकठिकाणी ६० मीटरच्या अंतरावर बोअर करुन, जमिनीतून निघणारे घटकद्रव्य(सेस्मीक डेटा) ‘इन्स्टुमेंट’ व्हॅनमध्ये संकलित करताना ‘लोकमत’ चमुला दिसून आले.
असा घेतला जातोय साठ्याचा शोध
भूगर्भ तज्ञांकडे जमिनीतील हायड्रोकार्बनची दिशा दाखविणारे अत्यानुधिक लेझर नावाचे तंत्रज्ञान असून, मोबाईलच्या टॉवरसारखी या सॅटेलाईटला रेंज असते. या तंत्रज्ञानाने जळगाव व पाचोरा तालुक्यातील गावांमध्ये हायड्रोकार्बनच्या साठ्यांचा प्रवाह असल्याचे दाखविले. त्यानुसार भूगर्भ तज्ञांनी अल्फा जिओ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मदतीने या भागात सॅटेलाईट केबल्स टाकल्या आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी ६० मीटरच्या अंतरावर लेझर बसविले आहे. तेथील जमिनीच्या आकारमानानुसार १५० ते १८० फुटापर्यंत बोअरींग केल्यावर मोठा स्फोट होतो. त्यातून जमिनीतील अनेक घटकद्रव्य लेझर मशिनमध्ये जमा होतात. लेझर मशिनमधून ते थेट इन्स्टुमेंट’ व्हॅनमध्ये आपोआप संकलित होतात. अशा प्रकारे जमिनीतील हायड्रोकार्बन साठ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
साठ्यांबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्सुकता
प्रत्येक जिल्ह्यातील गाळयुक्त खोºयामध्ये हे संशोधन केले जात आहे. जिल्हयातील जळगाव तालुक्याचा काही भाग व पाचोरा तालुक्यातील काही भाग गाळयुक्त खोºयामध्ये असल्याने या ठिकाणच्या जमिनीमध्ये हायड्रोकार्बन साठ्यांचा शोध घेण्यात येत आहे. जमिनीतून काढलेले घटकद्रव्य केंद्राच्या भूगर्भ संशोधन प्रयोगशाळेत जमा करण्यात येणार आहेत. दोन वर्षांनी या घटकद्रव्यांचे रुपांतर कशात होते. यावरुन हायड्रोकार्बनचा साठा आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.
अन् पिकांच्या नुकसानीची जागेवरच भरपाई
हायड्रोकार्बनच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी ज्या-ज्या ठिकाणी बोअरींग करण्यात येत आहे. त्यामध्ये बहुतांश भाग हा शेतीचा आहे. केंद्र सरकारचे काम असल्यामुळे कुठलाही शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत नसताना दिसून येत आहे. प्रत्येक गावांचे तलाठी व सरपंचांनादेखील या संदर्भात भूगर्भ तज्ञांकडून माहिती देण्यात येत आहे. बोअरिंग करण्यासाठी साधारणत: पाच ते दहा फुटांची जागा लागत असून, त्या जागेवरील पीक नुकसानीची भरपाई लगेच जागेवर धनादेशााच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
सॅटेलाईटच्या माध्यमातून हायड्रोकार्बनचा शोध
जळगाव जिल्ह्यात हायड्रोकार्बन साठे शोधण्याचे काम हैद्राबाद येथील अल्फा जिओ इंडिया लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. तीन दिवसांपासून या कंपनीचे कर्मचारी विविध तांत्रीक साधनसामुग्री घेऊन, जळगाव जिल्ह्यात आले आहेत. सॅटेलाईट ज्या दिशेला हायड्रोकार्बन साठ्यांचा प्रवाह दाखवेल, त्या दिशेला ठिक ६० मिटरच्या अंतरावर बोअर करुन सेंसरच्यामाध्यमातून सेस्मीक डाटा संकलीत करण्यात येत आहे.
या गावांमध्ये घेतले जाताय नमुने
दिल्ली येथून आलेले भूवैज्ञानिक सौरव चक्रवर्ती व त्यांची टीम तीन दिवसांपासून दापोरा, दापोरी, लमांजन, म्हसावद रवंजा, खेडी, कढोली व पाळधी येथे जमिनित बोअरिंग करुन हायड्रोकार्बनचा शोध घेतला. तर तिखी, पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे, जामणे, कुºहाड, बांबरुड या ठिकाणीदेखील जमिनीतील घटक द्रव्यांचे नमुने घेतले.
प्रदूषणावर हायड्रोकार्बन वायू एकमेव पर्याय
पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे होणाºया प्रदुषणाला आळा घालण्यासाठी हायड्रोकार्बन वायू हा एकमेव पर्याय आहे. हा एक नैसर्गिक वायू असून, याचा उपयोग स्वयंपाकाचा गॅस, वाहनासांठी व औद्योगिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असतो. जळगाव जिल्ह्यातही हायड्रोकार्बन साठ्यांचा शोध घेणे, ही आनंदाची गोष्ट आहे. अशी माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. पी. पी. माहुलीकर यांनी दिली.
जळगाव तालुक्यात व पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये हायड्रोकार्बन साठ्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. जमिनीतील घटकद्रव्य संकलित करत असून, दिल्ली येथे भूगर्भ संशोधन प्रयोगशाळेत नमुने जमा केले जाणार आहेत. त्या ठिकाणी त्यावर संशोधन केले जाणार आहे. साधारणत: दोन वर्षांनी या भागात हायड्रोकार्बनचा साठा आहे की नाही हे समजणार आहे.
-सौरव चक्रवर्ती, भूगर्भ तज्ञ.

Web Title: Researchers of hydrocarbon reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव