रावेर- यावल तालुक्यातील ३१ गावातील पोलीस पाटलांचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 11:55 PM2018-08-25T23:55:43+5:302018-08-25T23:59:32+5:30

जळगाव जिल्ह्यातील रावेर- यावल तालुक्यातील ११ नवीन तर २० जुन्या गावातील पोलीस पाटील पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

 Reservation of 31 police stations in Raver-Yaval taluka | रावेर- यावल तालुक्यातील ३१ गावातील पोलीस पाटलांचे आरक्षण जाहीर

रावेर- यावल तालुक्यातील ३१ गावातील पोलीस पाटलांचे आरक्षण जाहीर

Next
ठळक मुद्देमहिला राखीव असलेल्या जागा झाल्या खुल्यानवीन आरक्षणात ३० टक्के महिलांसाठी राखीव जागा

फैजपूर जि. जळगाव : येथील उपविभागीय कार्यालय अंतर्गत यावल -रावेर तालुक्यातील पोलीस पाटील भरतीचे आरक्षण जाहिर झाले आहे. यात एकूण ३१ गावांचे आरक्षण प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी जाहीर केले.
दोन्ही तालुक्यातील ३६ जागांवर ही पोलीस पाटील परीक्षा घेण्यात आली होती. त्यात १६ उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले होते. यात काही उमेदवारांनी आॅनलाइन फॉर्म भरलेच नसल्यानें तसेच काही जागांवर उमेदवार नापास ठरल्याने या २० रिक्त जागांवर तसेच नव्याने रावेर- यावल तालुक्यातील ११ जागांचे आरक्षण २३ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आले असल्याची माहिती फैजपूर येथील प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली.
यात प्रामुख्याने ज्या गावात पोलीस पाटील यांची पदे महिलांसाठी राखीव होते त्या ठिकाणी खुले करण्यात आले आहे. यात महिलांसाठी ३० टक्के राखीव पोलीस पाटील आरक्षण काढण्यात आले आहे. तसेच फैजपुर उपविभागातील संबंधीत गावांतील पदासाठी या गावातील पोलीस पाटील भरतीसाठी आरक्षण काढण्यात आले आहेत.
रावेर तालुक्यातील रिक्त पदे
बोहर्डी-अनुसूचित जाती, नांदूरखेडा- महिला- अनुसूचित जमाती , खानापूर - खुला, विमुक्त जाती , वाघोड-खुला, भटक्या जमाती अ, दोधे-खुला भटक्या जमाती, खिरवड-भटक्या जमाती ब, तामसवाडी- खुला जनरल, नीमडया-अनुसूचित जाती पेसा राखीव, मोहगण-खुला अनुसूचित जमाती , मोहमांडली-अनुसूचित जाती पेसा राखीव, कुसुंबा खु-अनुसूचित पेसा राखीव, लालमाती-खुला अनुसूचित जमाती पेसा, चिनावल-जनरल, मस्कावद सिम-इतर मागासवर्ग , कोचूर खुर्द-जनरल महिला, मंगरूळ-अनुसूचित जाती पेसा राखीव, थेरोळा-महिला इतर मागावर्गीय ,रसलपूर-भटक्या जमाती .
यावल तालुका
भोरटेक-अनुसूचित जाती जमाती, कोरपावली-अनुसूचित जाती जमाती, निमगाव-महिला अनुसूचित जमाती, भालोद-विमुक्त जाती अ, राजोरा- भटकी जमात ब, बोरखेडा खुर्द-अनुसूचित जमाती, पिंपरूड-महिला इतर मागासवर्गीय, कठोरे प्र.सावदा-अनुसूचित जमाती , किनगाव बुद्रुक-महिला भटकी जमात क , वड्री-महिला अनुसूचित जाती, डोंगर कठोरा-अनुसूचित जाती ,इचखेडा-महिला अनुसूचित जमाती, डांभुर्णी-जनरल

 

Web Title:  Reservation of 31 police stations in Raver-Yaval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस