बोदवड शहरासाठी ओझरखेड धरणात आरक्षण मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:13 AM2021-07-20T04:13:25+5:302021-07-20T04:13:25+5:30

बोदवड : शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी हतनूर धरणात बोदवड नगरपंचायतीचा पाणीसाठा आरक्षित ...

Reservation approved for Ojharkhed dam for Bodwad city | बोदवड शहरासाठी ओझरखेड धरणात आरक्षण मंजूर

बोदवड शहरासाठी ओझरखेड धरणात आरक्षण मंजूर

Next

बोदवड : शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी हतनूर धरणात बोदवड नगरपंचायतीचा पाणीसाठा आरक्षित करण्यात आला होता. परंतु पाच वर्षांत पाण्याचा थेंबही हतनूर धरणातून उचलून शहरात दाखल करण्यापर्यंत नगरपंचायतला काम करता आले नाही, तर सोमवारी पुन्हा सत्ताधारी नगरसेवकांनी जळगाव येथे शासकीय विश्रामगृहावर आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यानंतर आमदार यांनी पाणीपुरवठामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत बोदवड तालुक्यातील पाणीटंचाईवर त्यांना माहिती देत बोदवड शहरासाठी ओझरखेड धरणात पाणीसाठा आरक्षित करण्यासाठी साकडे घातले असता पालकमंत्री पाटील यांनी आमदारांच्या मागणीला होकार देत ओझरखेड धरणात पाणीसाठा आरक्षित करण्यासाठी सदर विभागला सूचना दिली आहे.

प्रसंगी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष पती सईद बागवान, उपनगराध्यक्ष दिनेश माळी, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक देवा खेवलकर, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक संजय गायकवाड, नगरसेवक विजय पालवे, नगरसेवक असलम बागवान, नगरसेवक इरफान शेख, नगरसेवक सलीम कुरेशी, नगरसेवक धनराज गंगतिरे, नगरसेवक अकबर बेग, नगरसेवक पप्पू चव्हाण , तुषार बोरसे आदी उपस्थित होते.

Web Title: Reservation approved for Ojharkhed dam for Bodwad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.