रहिवासी अद्यापही सावरलेले नाहीत धक्क्यातून

By admin | Published: April 4, 2017 01:05 AM2017-04-04T01:05:14+5:302017-04-04T01:05:14+5:30

भादली बु.।। येथील भोळेवाडा सुन्नच ! चौघांच्या हत्येबाबत कुणी बोलेना प्रदीप भोळेंचे घर बंद, सामान घराबाहेर

Residents are still not shocked | रहिवासी अद्यापही सावरलेले नाहीत धक्क्यातून

रहिवासी अद्यापही सावरलेले नाहीत धक्क्यातून

Next

चंद्रकांत जाधव जळगाव
भादली बु.।। ता.जळगाव येथील हत्या झालेल्या भोळे कुटुंबाचे घर 13 दिवसांपासून बंद आहे. या घरातील सामानही बाहेर पडून आहे. कुणी या घरानजीक जात नाही. पोलीस दररोज फे:या मारतात.. मयत भोळे यांच्या भोळे वाडय़ातील रहिवासी या हत्याकांडमुळे बसलेल्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाहीत.. पोलीस गावात रोज येतात.. सीआयडीचे अधिकारी चौकश्या करतात पण तपास लागलेला नाही. कुणी या हत्याकांडविषयी फारसे मोकळेपणाने बोलत नाही.. पण या घटनेचा उलगडा व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांना असल्याचे ‘लोकमत’चमूने भादली येथे केलेल्या पाहणीनंतर जाणवले.
14 दिवस उलटूनही गुन्ह्याचा तपास लागेना
20 मार्च रोजी भादली बु.।। येथील श्रीकृष्ण मंदिरानजीक भोळे वाडय़ात प्रदीप सुरेश भोळे (वय 45), त्यांची पत्नी संगीता भोळे (वय 35), मुलगी दिव्या भोळे (6 वर्षे) व मुलगा चेतन भोळे (4 वर्षे) यांची निर्घृण हत्या झाली. ही हत्या मध्यरात्रीनंतर झाली असावी, असा अंदाज यापूर्वीच पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्याकांडला 14 दिवस झाले, तरी अजून पोलीस तपासातून काही उलगडा झालेला नाही.   चौकशी सुरू आहे, पण मारेकरी कोण हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर ‘लोकमत’ने भादली येथे पाहणी केली. काही ग्रामस्थांशी संवाद साधला..
आम्ही भोळे वाडय़ात फारसे जातच नव्हतो.. काही माहिती नाही..
लोकमत प्रतिनिधी मुख्य बसस्थानकाकडून श्रीराम मंदिराकडे जाणा:या मार्गावरून जात असताना एका बंद घरानजीक ओटय़ावर बसलेल्या साधारणत: साठीतल्या व्यक्तीशी संवाद साधला.. भोळे हत्याकांडविषयी त्या व्यक्तीस विचारले असता.. मयताचे नाव सांगता येणार नाही..    पण त्याने शेतीचा व्यवहार केला होता.. पैसे मिळाले नव्हते..     अशातच त्याच्या कुटुंबाचा घात झाला..      त्यांच्या भोळे वाडय़ात मी फारसा जात नाही. त्याची पाश्र्वभूमी सांगता येणार नाही.. लग्न, मरण यानिमित्त त्यांच्या वाडय़ाकडे जाणे होते.. तेवढेच.. नंतर दोन प्रौढ व्यक्ती या ओटय़ावर बसायला आल्या.
त्यांच्यात नंतर शेती, ज्वारी (दादर) कापणीची चर्चा सुरू झाली.
 मध्येच लोकमत प्रतिनिधीने मयत भोळे यांचे हॉटेल कुठे होते.. असे विचारले.. हॉटेल नेमके कुठे आहे ते सांगता येणार नाही..      पण ते श्रीराम मंदिरानजीकच्या पुढे आहे.., असे त्यांनी सांगितले..        भोळेंविषयी फारसे               सांगता येणार नाही..,  असेही त्यांनी सांगितले.      मध्येच त्या व्यक्तींनी विविध कार्यकारी सोसायटीच्या कर्जाचा विषय चर्चेत घेतला.. नंतर लोकमत प्रतिनिधी तेथून मार्गस्थ झाला..
लोकमत प्रतिनिधी श्रीराम मंदिरानजीक एका कोप:यावर बंद घरानजीक बसलेल्या युवकानजीक गेला. तो महानुभव पंथी व्यक्तीशी चर्चा करीत होता. त्याला मयत भोळेंच्या घराची माहिती विचारली असता.. श्रीकृष्ण मंदिरानजीक जा.. असे त्याने सांगितले.. नंतर भोळेंचे हॉटेल व त्यांच्या घरी कोण असते, असा मुद्दा मांडला असता.. याबाबत अधिकचे सांगता येणार नाही.. आपण भोळे वाडय़ातच जा.. त्यांच्या नातेवाइकांना भेटा असे त्या युवकाने सांगितले.. नंतर या युवकाने बोलणे टाळले..
घरभरणीचे दोन कार्यक्रम रद्द़़़
रडे  वाडय़ात एका व्यक्तीने नवीन घर बांधले.. घरभरणीच्या कार्यक्रमासाठी गहू व इतर साहित्यही आणले होते.. पण भोळे यांच्या हत्याकांडनंतर त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला.. असाच कार्यक्रम भोळे वाडय़ातील पाटील कुटुंबीयांनीही रद्द केल्याचे रडे वाडय़ातील एका व्यक्तीने सांगितले..
घटनाक्रम
20 मार्च - भादली येथे भोळेवाडय़ात प्रदीप सुरेश भोळेंसह त्यांची पत्नी संगीता भोळे, मुलगी दिव्या भोळे व मुलगा चेतन भोळे यांची मध्यरात्रीनंतर निर्घृण हत्या.
21 मार्च - भादली येथे कडकडीत बंद.
22 मार्च - हत्यांकांड प्रकरणात ठोस माहिती किंवा नावे सांगणा:या व्यक्तीला 25 हजारांच बक्षीस देण्याची पोलिसांतर्फे घोषणा.
23 मार्च - मयत भोळे यांच्या तीन बहिणी, मेहुणे व इतर तीन अशा नऊ जणांची पोलिसांकडून चौकशी.
24 मार्च - पोलिसांकडून बक्षिसाची रक्कम 25 हजारांवरून 50 हजार केल्याची घोषणा. भादली येथे पोलीस दलातर्फे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांसोबत विशेष बैठक.
28 मार्च - हत्याकांड प्रकरणाची माहिती चिठ्ठी किंवा इतर स्वरुपात मिळावी यासाठी भादली येथील बसस्थानक व श्रीराम मंदिरानजीक पोलीसमित्र पेटय़ा लावल्या.
2 एप्रिल - नाशिक येथील गुन्हे अन्वेषण विभागाची भादलीला भेट.

Web Title: Residents are still not shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.