यावल येथे मूलभूत सुविधांसाठी रहिवाशांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 09:09 PM2018-12-10T21:09:26+5:302018-12-10T21:10:40+5:30
यावल येथील आदिवासी तडवी वसाहतीमध्ये सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी सोमवारी पालिका कार्यालयासमोर उपोषण केले. अखेर यशस्वी चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावल, जि.जळगाव : येथील आदिवासी तडवी वसाहतीमध्ये सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी सोमवारी पालिका कार्यालयासमोर उपोषण केले. अखेर यशस्वी चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले.
आदिवासी तडवी वसाहतीत अनेक वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना नागरी सुविधापासून वंचित रहावे लागत असल्याने व वारंवार पालिकेकडे मागणी करून सूविधा दिल्या जात नसल्याने आदिवासी-तडवी समाजबांधवांनी सोमवारी पालिकेच्या समोर उपोषणास बसले. तेव्हा उपनगराध्य मुकेश येवले, मुख्याधिकारी राजेंद्र लांडे, नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवका नौशाद तडवी, नगरसेवक दीपक बेहेडे व रहिवाशांमध्ये यशस्वी चर्चा होऊन उपोषणा मागे घेण्यात आले. मुख्याधिकारी यांनी चौदावा वित्त आयोग अथवा अन्य कोणत्या ही निधीतून वसाहतीत गटारी बांधून देण्याचे आश्वासन दिले. शिराज तडवी, नामदर तडवी, हमीदा तडवी, रमजान तडवी यांच्यासह सुमारे ५० रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. रहिवाशांनी निवेदनात आमच्या प्रभागाचे नगरसेवक विरोधी गटाचे असल्यानेच या प्रभागातील रहिवाशांना नागरी सुविधापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप केला आहे.