जळगावातील रहिवासी टाकणार मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 09:48 PM2018-07-25T21:48:09+5:302018-07-25T21:51:08+5:30
मुलभुत सुविधा तसेच रस्त्यासाठी जुना खेडी रस्ता परिसरातील काशिनाथ नगर रहिवाश्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे़ ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे चिखलातून रहिवाश्यांना वाट काढावी लागत आहे़ तोच रस्त्याची वाट बिकट असल्यामुळे उमेदवारांनी देखील या भागात प्रचार करणे टाळल्याचे रहिवाश्यांनी सांगितले़
जळगाव- मुलभुत सुविधा तसेच रस्त्यासाठी जुना खेडी रस्ता परिसरातील काशिनाथ नगर रहिवाश्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे़ ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे चिखलातून रहिवाश्यांना वाट काढावी लागत आहे़ तोच रस्त्याची वाट बिकट असल्यामुळे उमेदवारांनी देखील या भागात प्रचार करणे टाळल्याचे रहिवाश्यांनी सांगितले़
काशिनाथ नगरातील रस्त्यांची अत्यंत दैना झाली आहे़ ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे़ चिखलात वाहन अडकत असल्यामुळे रिक्षा व व्हॅन देखील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसाय होत आहे़ याबाबत अनेक वेळा मनपाकडे रहिवाश्यांनी रस्ता दुरूस्तीसाठी तक्रारी केल्या़ मात्र, मनपा प्रशासनाने तक्रारींची दखलच घेतली नाही. दोन वर्षांपासून नगरसेवकांना देखील रस्त्यांची दुरूस्तीबाबात सांगून सुध्दा अद्याप काहीही झालेले नाही़ त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने, या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी रहिवाशी प्रशांत धांडे, एस़बी़वाणी, विनोद तावडे, के़जी़सरोदे, प्रतिभा राणे, शिल्हा येवले, सुनंदा रोटे, केतकी सरोदे, धीरज वाणी आदी उपस्थित होते़