जळगाव शहरात चालता फिरता रुग्ण दगावल्याने नातेवाईकांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:15 PM2018-02-28T23:15:52+5:302018-02-28T23:15:52+5:30
पाचोरा येथील खासगी दवाखान्यातून सुटका झाल्यानंतर जळगाव शहरातील अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलेल्या निवृत्ती सुपडू पाटील (वय ३२ रा.कळमसरे, ता.पाचोरा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली. चालता फिरता आलेल्या निवृत्तीचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करुन डॉक्टरांवरच आरोप केले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २८ : पाचोरा येथील खासगी दवाखान्यातून सुटका झाल्यानंतर जळगाव शहरातील अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणलेल्या निवृत्ती सुपडू पाटील (वय ३२ रा.कळमसरे, ता.पाचोरा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा आठ वाजता घडली. चालता फिरता आलेल्या निवृत्तीचा अचानक मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करुन डॉक्टरांवरच आरोप केले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, निवृत्ती पाटील या तरुणाचा आठ दिवसापूर्वी कुºहा-जामनेर रस्त्यावर अपघात झाला होता. दुचाकीवरुन घसल्याने डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्याला पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी निवृत्ती याची त्या दवाखान्यातून सुटका झाली. डोक्याला मार लागल्याने जळगावात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेऊ म्हणून नातेवाईकांनी निवृत्ती याला मंगळवारी सायंकाळी महामार्गाला लागून असलेल्या डॉ.निलेश किनगे यांच्या अॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी निवृत्तीला अतिदक्षता विभागात ठेवण्याचा सल्ला दिला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती पाटील या तरुणावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले होते, मात्र डॉक्टर निलेश किनगे यांना बाहेरगावी काम असल्याने ते निघून गेले. बुधवारी ते हॉस्पिटलमध्ये नव्हते. साडे पाच वाजता डॉ.संजीव हुजूरबजार यांनी रुग्णाची तपासणी केली होती. त्यानंतर रात्री आठ वाजता पत्नी मायाबाई ही अतिदक्षता विभागात गेली असता निवृत्तीचे ह्दय बंद पडले होते.