जामनेरात मोबाइल टॉवर उभारणीस रहिवाशांचा तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:33 PM2019-11-22T18:33:27+5:302019-11-22T18:34:34+5:30
पालिका हद्दीतील हिवरखेडा रोड सानेगुरुजी कॉलनी येथील रहिवाशी भागात मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी या कामास तीव्र विरोध केला आहे.
जामनेर, जि.जळगाव : पालिका हद्दीतील हिवरखेडा रोड सानेगुरुजी कॉलनी येथील रहिवाशी भागात मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी या कामास तीव्र विरोध केला आहे. अन्यथा पालिकेसमोर उपोषण करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.
या टॉवरच्या ध्वनीलहरीे व प्रदूषणामुळे लहान मुल,े वृद्ध नागरिक तसेच सर्वांना त्रास होणार आहे. आरोग्यासाठी हानिकारक आहे. कॉलनीतील रहिवाशांनी कोणतेही संमतीपत्र दिलेले नसून, प्रचंड विरोध आहे. तसेच जिओ टॉवरसंदर्भात अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी दिल्या.
जिओ टॉवरचा ठेकेदार अनधिकृतपणे टॉवर उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे काम राहिवाशांच्या हिताचे नाही. यासाठी हे काम पालिकेने त्वरित थांबवावे व परवानगी देऊ नये अन्यथा पालिकेसमोर उपोषण करण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन रहिवाशांनी मुख्याधिकरी राहुल पाटील व पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना दिले आहे.
निवेदनावर गजानन चौधरी, डी.बी.महाजन, अरुण चौधरी, प्रकाश फडणीस, नारायण लोखंडे, यशवंत महाजन, डॉ.प्रदीप बाविस्कर, देवीदास महाजन, दीपक सोनवणे, नेमीचंद तेली, प्रशांत वराडे, किशोर चौधरी, संजय कापडे, सतीश पालवे, विश्वनाथ कुमावत यांच्यासह इतरांच्या साह्य आहेत.
संबंधित ठेकेदार व मालकाला नोटीस बजावली आहे. तसेच स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्यामुळे बांधकाम परवानगीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
-राहुल पाटील, मुख्याधिकारी, नगरपालिका, जामनेर