तो ठराव भ्रष्टाचार करण्यासाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:23+5:302021-03-01T04:19:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी तसेच दैनिक वैतनिक, उद्यान कर्मचारी यांच्या पगाराची बिले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी तसेच दैनिक वैतनिक, उद्यान कर्मचारी यांच्या पगाराची बिले अदायगी करण्यासाठी उपकुलसचिव, विधि व माहिती अधिकार यांच्याकडे पाठविण्यात येऊ नये, असा ठराव विद्यापीठाने पास केला होता. हा ठराव अत्यंत चुकीचा असून टक्केवारी मिळावी, यासाठी ठराव मंजूर करून मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप ॲड. कुणाल पवार यांनी केला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सुरक्षारक्षकांच्या पगाराची बिले अदायगी करण्यासाठी उपकुलसचिव, विधि व माहितीचा अधिकार यांच्याकडे पाठवू नये, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला होता. त्यात सुरक्षारक्षक सोबतच सफाई कर्मचारी तसेच दैनिक वैतनिक, उद्यान कर्मचारी यांच्या पगाराची बिले अदायगी करण्यासाठी उपकुलसचिव, विधि व माहिती अधिकार यांच्याकडे पाठवू नये असा सर्वानुमते ठराव करण्यात आला होता. माहिती अधिकार यांच्याकडे बिले न पाठविण्याचा हा ठराव चुकीचा आहे. टक्केवारी मिळावी आणि भ्रष्टाचार करता यावा यासाठी माहिती अधिकार त्यातून वगळले असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. तसेच सुरक्षारक्षकांना ठेकेदारांकडून बोनसदेखील दिला जात नाही. एवढेच नाहीतर पी.एफ. सुद्धा दिला जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.