डॉक्टरांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडविणार - डॉ. प्रताप जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 11:13 AM2017-08-05T11:13:02+5:302017-08-05T11:14:35+5:30

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर प्रथमच जळगावला संधी

Resolving the problem of doctors - Dr. Pratap Jadhav | डॉक्टरांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडविणार - डॉ. प्रताप जाधव

डॉक्टरांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडविणार - डॉ. प्रताप जाधव

googlenewsNext
ठळक मुद्दे1993 पासून जळगावात रुग्ण सेवासामाजिक कार्यात योगदानसामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर संधी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 5 -  वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेले जाचक नियम, अटी व त्या बाबत डॉक्टरांना वेठीस धरले जाते ते प्रश्न  मार्गी लावण्यासाठी अविरत काम सुरू ठेवू, अशी ग्वाही  प्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रताप जाधव यांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर निवड झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना दिली. या सोबतच जळगावला ही प्रथमच संधी मिळाल्याने खान्देशातील डॉक्टरांच्या समस्या, अडीअडचणी संवेदनशीलतेने सोडवू असेही डॉ. जाधव यांनी सांगितले. 
डॉ. जाधव यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर निवड झाल्यानंतर त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचीत केली. त्यावेळी त्यांनी आपला मनोदय  व्यक्त केला. 
डॉ.प्रताप जाधव हे  मूळचे फुपनगरी, ता.जळगाव येथील रहिवासी असलेले  डॉ. जाधव यांनी  यांनी 1989 मध्ये एम.एस.आर्थोची पदवी मिळवली. त्यानंतर 1993 मध्ये त्यांनी जळगावात रुग्ण सेवा सुरू केली. सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
वैद्यकीय सेवेसह डॉ. जाधव यांचे सामाजिक कार्यातही मोठे योगदान आहे. जळगाव जनता बॅँकेच्या उपाध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ संस्थेवरही त्यांनी काम केले आहे. तसेच जळगावात मतीमंद मुलांसाठी असलेल्या ‘आश्रय माङो घर’ या उपक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. 
काय आहे कौन्सिलचे काम?
अॅलोपॅथीची पात्रता मिळविलेल्या डॉक्टरांची महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलवर नोंदणी होते.त्यानंतर डॉक्टरला क्रमांक मिळतो.तेव्हाच डॉक्टर अधिकृतपणे प्रॅक्टीस करु शकतो. डॉक्टरांसाठी कौन्सिलने नियमावलीची आचारसंहिता ठरवून दिलेली आहे. त्याचे डॉक्टर पालन करतात की नाही हे तपासण्याचे काम समिती करते.

Web Title: Resolving the problem of doctors - Dr. Pratap Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.