काँग्रेस मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:43 PM2019-04-03T12:43:02+5:302019-04-03T12:43:42+5:30

डॉ.उल्हास पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

Resource on Water Resources Minister Girish Mahajan in the Congress Meet | काँग्रेस मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर शरसंधान

काँग्रेस मेळाव्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर शरसंधान

Next

जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सत्तेची मस्ती आली असून, सत्तेचा वापर करून ते जिल्ह्यात दहशत माजवत आहे. लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून बाहेर काढून व जामनेरमध्ये गिरीश महाजनांचा पराभव करून त्यांच्या दहशतीतून जिल्ह्याला मुक्त करण्याचा संकल्प मंगळवारी शहरातील लेवा भवन येथे झालेल्या मेळाव्यात कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
रावेर लोकसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यापूर्र्वी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे कॉँग्रेस व राष्टÑवादीचा मेळावा झाला. मेळाव्यात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कॉँग्रेसच्या जिल्हा प्रभारी हेमलता पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अरुण पाटील, कॉँग्रेसचे महानगरप्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, गफ्फार मलीक, राष्टÑवादीचे निरीक्षक करण खलासे, पीपीपीचे जगन सोनवणे, यांच्यासह कॉँग्रेस व राष्टÑवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आता जर आपला पराभव झाला तर भविष्यात उमेदवार मिळणार नाही - डॉ.सतीश पाटील
रावेरची जागा कॉँग्रेस तर जळगावची जागा राष्टÑवादीकडे आली असून, दोन्ही पक्षाने एकमेकांसाठी काम करणे गरजेचे आहे. कारण या निवडणुकीत जर आपला पराभव झाला तर भविष्यात भाजपा विरोधात लढण्यासाठी आपल्याला उमेदवार मिळणार नाही, असे मत राष्टÑवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी व्यक्त केले. तसेच दोन्ही जागा जिंकून गिरीश महाजनांची झोप उडवून द्या, असेही आवाहन त्यांनी केले.
खडसे - महाजनांनी काय काम केले? - रवींद्र पाटील
गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्यात एकही विकासाचे काम केले नाही, केवळ थापा मारल्या. बोदवडला १५-१५ दिवस पाणी पुरवठा होत नाही. डॉ.उल्हास पाटील यांनी निवडून आल्यानंतर बोदवडचा पाणी प्रश्न सोडविण्याची हमी दिली तरच आम्ही त्यांचे काम करु, असा इशारा राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांनी दिला.
विद्यमान खासदारांनी केवळ रेल्वेला थांबा देण्याचे काम केले - अरुणभाई गुजराथी
विद्यमान खासदारांनी गेल्या निवडणुकीत जी काही आश्वासने दिली होती. त्यापैकी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नसून, केवळ रेल्वेला थांबा देण्याचे काम केले. आता त्यांना थांबा देण्याची वेळ आली असल्याचे अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले. या मेळाव्यात करण खलसे, डॉ.राधेश्याम चौधरी, गफ्फार मलीक, सलीम पटेल, संजय गरुड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सिंहस्थाचे टॉनीक घेवून फुगलेला फुगा फोडून काढा - हेमलता पाटील
जिल्ह्यातील एक मंत्री नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे टॉनीक घेवून, फुगला असून त्यांचा अहंकार आपल्याला या निवडणुकीत फोडायचा असल्याचे आवाहन कॉँग्रेसच्या प्रभारी हेमलता पाटील यांनी या मेळाव्यात केले.
त्यांची सत्तेची मस्ती आता जिरवण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या.
शक्तीप्रदर्शन करीत दाखल केला अर्ज
रावेर लोकसभा मतदार संघातून कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांनी मंगळवारी शक्तीप्रदर्शन करत दोन प्रतीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आधी मेळावा घेण्यात आला. त्यानंतर लेवा भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही रॅली पोहोचल्यावर तेथे प्रचंड गर्दी झाली होती. जिल्हाभरातून वाहने या ठिकाणी आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयसमोरून जाणारी वाहतूक भास्कर मार्केटकडे वळविण्यात आली होती. यावेळी डॉ. पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

Web Title: Resource on Water Resources Minister Girish Mahajan in the Congress Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.