नाटय़ परिषदेच्या पुरस्काराने जळगावच्या ‘परिवर्तन’ चा सन्मान

By admin | Published: June 15, 2017 12:36 PM2017-06-15T12:36:20+5:302017-06-15T12:36:20+5:30

कै.विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर व कै. भाई बोरकर पुरस्काराने परिवर्तन जळगाव संस्थेला सन्मानित करण्यात आले.

Respect for the 'Transformation' of Jalgaon by the Natya Parishad Award | नाटय़ परिषदेच्या पुरस्काराने जळगावच्या ‘परिवर्तन’ चा सन्मान

नाटय़ परिषदेच्या पुरस्काराने जळगावच्या ‘परिवर्तन’ चा सन्मान

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून साहित्य, नाटय़, संगीत, चित्र, शिल्प अशा कलाप्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करणा:या ‘परिवर्तन’ या संस्थेला अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्थेचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बुधवारी  माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
 अखिल भारतीय नाट्य परिषदेचा या 2016-17 यावर्षीचा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्थेचा कै.विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर व कै. भाई बोरकर पुरस्काराने परिवर्तन जळगाव संस्थेला सन्मानित करण्यात आले.
नाटय़ निर्माते अनंत पणशीकर, उदय धुरत, लता नार्वेकर, श्रीपाद जोशी,  गोपाळ अलगीर , दिनू पेडणेकर , प्रसाद कांबळी , संदेश भट, आनंद नांदलोटकर या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
परिवर्तनच्यावतीने मंजुषा भिडे, मोना तडवी, मंगेश कुलकर्णी, योगेश चौधरी, राहुल निंबाळकर , हर्षल पाटील, प्रतीक्षा  कल्पराज यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. 

Web Title: Respect for the 'Transformation' of Jalgaon by the Natya Parishad Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.