भुसावळ युवासेनेतर्फे नवमतदार नोंदणीला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 07:17 PM2018-09-22T19:17:25+5:302018-09-22T19:18:29+5:30

 Responding to the newly-elected registration by Bhusawal Yuva Sena | भुसावळ युवासेनेतर्फे नवमतदार नोंदणीला प्रतिसाद

भुसावळ युवासेनेतर्फे नवमतदार नोंदणीला प्रतिसाद

Next
ठळक मुद्देसाडेचारशेपेक्षा जास्त अर्ज झाले संकलितसर्व अर्ज तहसीलला केले जमा

भुसावळ : विधानसभा मतदार नोंदणीसाठी शनिवारी भुसावळ युवासेनेतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष अभियानास भुसावळ शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नाहाटा कॉलेजजवळ नवमतदारांची प्रचंड गर्दी उसळल्याने नमुना क्रमांक सहा हे अर्ज संपले. त्यामुळे झेरॉक्स प्रती काढून यंत्रणेला वेळ भागवावी लागली. आज साडेचारशेपेक्षा जास्त अर्ज संकलित झाले.
शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता डॉ.नीलेश महाजन यांच्या हस्ते कार्यक्रमास सुरुवात झाली.
याप्रसंगी भुसावळ शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, शहरप्रमुख बबलू बºहाटे, नीलेश महाजन, शहर संघटक योगेश बागुल, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, शिक्षकसेना तालुकाप्रमुख अतुल शेटे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पूनम बºहाटे, महिला विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रकांता बोरसे, शहर संघटिका वासंती चौधरी, भारतीय विद्यार्थी सेना शहरप्रमुख हेमंत बºहाटे, युवा सेना शहर चिटणीस सूरज पाटील, कल्पेश बाविस्कर, सचिन सोनार, विशाल लोखंडे, गौरव पवार, कल्पेश सोनवणे, सुरेंद्र सोनवणे, मनोज पाटील, पंकज परदेशी, भूषण सोनार, नितीन पाटील, युगेंद्र काकडे, पवन बाक्षे, मयुर जाधव, स्वप्नील पवार, ललित सैतवाल, नीलेश हिवरे व युवासैनिक उपस्थित होते.
सर्व फॉर्म तहसील कार्यालयाचे निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. तहसीलतर्फे युवासेनेच्या मतदार नोंदणी उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.





 

Web Title:  Responding to the newly-elected registration by Bhusawal Yuva Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.