चाळीसगावला उमेद अभियानास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:39+5:302021-08-14T04:20:39+5:30

चाळीसगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या ...

Response to Chalisgaon Umed Abhiyan | चाळीसगावला उमेद अभियानास प्रतिसाद

चाळीसगावला उमेद अभियानास प्रतिसाद

googlenewsNext

चाळीसगाव : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पडून जगात उपलब्ध असलेल्या आर्थिक प्रगतीच्या पर्यायांना निवडून आपल्यासह आपल्या परिवाराची आर्थिक उन्नती साधावी यासाठी जीवनोन्नती अभियान आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त मार्च ते ऑगस्ट २०२१ या ७५ आठवड्यांच्या कालावधीत आझादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. उमंग महिला संस्थेच्या अध्यक्षा संपदा पाटील यांनी मार्गदर्शन केले.

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव, पिंप्री, देवळी, डोणदिगर, टाकळी प्रदे, तळोदे प्रदे, देशमुखवाडी, तामसवाडी, उपखेड, अलवाडी, चिंचखेडे, पिंपळवाड म्हाळसा, पातोंडा, रांजणगाव यासह विविध ठिकाणी या अभियानाअंतर्गत महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संवाद कार्यक्रमाचा लाभ घेतला.

चाळीसगाव पंचायत समितीच्या माध्यमातून केंद्राच्या ग्रामविकास विभाग आयोजित तालुक्यातील विविध ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी महिलांशी सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित आडगाव जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात संपदा पाटील बोलत होत्या.

व्यासपीठावर आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील, मुख्याध्यापक पी. बी. चव्हाण, ग्रामसेवक विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, अभियान समन्वयक प्रताप शिवरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पिंप्री प्रदे येथे झालेल्या कार्यक्रमाला सरपंच सचिन पाटील, सुभाष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप पाटील, समन्वयक विकी पाटील, उपसरपंच मंगलबाई गुलाब पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुनंदाबाई पाटील, उज्वलाबाई पाटील, आदी उपस्थित होते.

सुरुवातीला तालुका समन्वयक प्रताप शिवरकर यांनी प्रास्ताविक केले. आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांनी संपदा पाटील यांचा सत्कार केला.

Web Title: Response to Chalisgaon Umed Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.