दहीवेल मार्केटला व्यापाºयांचा प्रतिसाद

By admin | Published: January 4, 2017 12:19 AM2017-01-04T00:19:56+5:302017-01-04T00:19:56+5:30

दहीवेल : साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने दहीवेल येथे मागील महिन्यांपासून भुसार, शेतमाल खरेदी-विक्री केंद्र सुरू केले आहे.

A response to the Dhevel Market market | दहीवेल मार्केटला व्यापाºयांचा प्रतिसाद

दहीवेल मार्केटला व्यापाºयांचा प्रतिसाद

Next

दहीवेल : साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने दहीवेल येथे मागील महिन्यांपासून भुसार, शेतमाल खरेदी-विक्री केंद्र सुरू केले आहे. या केंद्राला परिसरातील व्यापाºयांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. भावही चांगला मिळत असल्याने आवकही वाढली आहे. परिसरातील ५० ते ६० गावांतील शेतकºयांची दहीवेल येथेच यामुळे सोय झाली आहे.
धुळे-सुरत राष्टÑीय महामार्गावर दहा ते बारा हजार लोकवस्तीचे दहीवेल गाव आहे. परिसरातील ५० ते ६० गावांना हे मध्यवर्ती चौफुलीचे ठिकाण आहे. येथून नाशिक राज्य मार्ग जातो. परिसरातील बाजारपेठेचे गाव म्हणून दहीवेलची ओळख आहे. साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीने साक्री, पिंपळनेर, निजामपूर व दहीवेल या चार ठिकाणी मार्केट सुरू करून तालुक्यातील शेतकºयांची सोय केली आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च व वेळेची बचत होत आहे.
दरम्यान, दहीवेल येथे सेंट्रल बँकेची शाखा असल्याने त्यावर ५० ते ६० गावांचा ताण पडत आहे. यामुळे येथे अजून एका राष्टÑीयकृत बँकेची शाखा कार्यान्वित होण्याची गरज  आहे.
दहीवेल परिसरातील सुमारे ५० ते ६० गावांतील शेतकºयांना भुसार व शेतमाल विक्रीसाठी साक्री येथे जावे लागत होते. मात्र, दहीवेल येथेच सोय झाल्यामुळे वेळ व आर्थिक बचत होत आहे.

Web Title: A response to the Dhevel Market market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.