नाताळनिमित्त ब्रॅण्ड गारमेंटस् प्रदर्शन व विक्रीला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:26 AM2020-12-05T04:26:21+5:302020-12-05T04:26:21+5:30
जळगाव : खास नाताळनिमित्त जागतिक दर्जाच्या व विविध नामांकित कंपन्यांचे ब्रॅण्ड गारमेंटस् प्रदर्शन व विक्रीला शुक्रवार,४ डिसेंबर पासून सुरुवात ...
जळगाव : खास नाताळनिमित्त जागतिक दर्जाच्या व विविध नामांकित कंपन्यांचे ब्रॅण्ड गारमेंटस् प्रदर्शन व विक्रीला शुक्रवार,४ डिसेंबर पासून सुरुवात झाली. प्रदर्शन व विक्री १५ डिसेंबरपर्यंत छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे सुरु राहणार आहे. या प्रदर्शन व विक्रीत जागतिक दर्जाचे रेमण्ड, ब्लॅकबेरीज, पिटर इंग्लंड, येप मी, पेपे जीन्स, इंडियन टेर्रेन, सियारामस् मोझो, सिंगल, पॅन्टालून्स, बिबा आदी दर्जेदार ब्रॅण्ड उपलब्ध करून दिले आहेत. यासह जेंटस्, लेडिज् व किडस् वेअरच्या अनेक व्हारायटीसह फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे. या प्रदर्शन व विक्रीत ब्रॅण्डेड गारमेंट्सच्या हजारो व्हरायटीज तसेच अनेक डिझाईन्स चे दर्जेदार वस्त्रांचा भव्य व आकर्षक फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे. सवलतीच्या दरातही विविध प्रकारचे वस्त्र उपलब्ध आहे. स्थानिक किरकोळ विक्रेते, दुकानदार सुद्धा माल खरेदीसाठी संपर्क करू शकणार आहेत. सर्व प्रकारचे डेबीट, क्रेडिट कार्डद्वारेही पेमेंट स्वीकारले जात असून प्रदर्शन व विक्री सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू असणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.