महाराष्ट्र बंदला पारोळा, चोपडय़ात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2017 01:17 PM2017-06-05T13:17:12+5:302017-06-05T13:17:12+5:30
अमळनेर : अपेक्षित प्रतिसाद नाही
Next
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.5- कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला चोपडा, पारोळ्यात प्रतिसाद मिळाला. तर अमळनेरात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
अमळनेर येथे आज आठवडे बाजार होता. नेहमीप्रमाणे आठवडे बाजार भरला. भाज्यांची आवकही चांगली होती. विशेष भाज्यांचे दरही आवाक्यातच होते. संपाची झळ भाजीबाजाराला बसली नाही.
राज्यव्यापी बंदला मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. व्यापा:यांनी दुकाने बंद करावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर निकम, हिरामण पाटील,राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रा.शिवाजी पाटील, अरूण देशमुख, संभाजी ब्रिगेडचे वाल्मिक पाटील, जयवंत शिसोदे, सतीश पाटील, उत्तमराव देशमुख, गणेश चिकाटे, विरभान पाटील आदींनी गंगाघाटमध्ये जाऊन व्यापा:यांना बंदचे आवाहन केले होते. व्यापा:यांनीही तात्पुरते दुकाने बंद करून पुन्हा सुरू केली होती. इतर ठिकाणी दुकाने सुरळीत सुरू होती.
पारोळा येथे शेतकरी आंदोलनास पाठींबा म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पारोळ्यात प्रतिसाद मिळाला. माजी आमदार चिमणराव पाटील, कृउबा सभापती अमोल पाटील, जि.प.चे माजी सभापती डॉ. दिनकर पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, अरुण पाटील,रवी पाटील,प्रेमानंद पाटील, तालुका शिवसेना प्रमुख आर. बी. पाटील, अण्णा चौधरी, शहरप्रमुख बापू मिस्त्री, रशिदखान लोहार, बी. एन.पाटील आदींनी बंदचे आवाहन केले. यावेळी दाणा बाजार, सराफ बाजार, भाजी मार्केट, बी बियाणे व्यावसायिक, कॉटन मार्केट यांच्यासह इतर व्यापा:यांनी बंद पाळला.
चोपडा येथे शेतकरी कृती समितीच्या पदाधिका:यांनी शहरात फिरून ज्यांनी दुकाने व व्यवसाय सुरू केला अशांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्याला अनेक व्यापा:यांनी दुकाने बंद ठेवून शेतकरी संपाला प्रतिसाद दिला. सकाळच्यावेळी बहुतांश दुकाने बंद होती. यावेळी एस.बी.पाटील, संजीव सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, आदी उपस्थि होते. काही राजकीय पदाधिका:यांनीही बंदला पाठिंबा दिला.