भुसावळात सुन्नी धार्मिक दर्शन व प्रवचन सोहळ्यास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:53 PM2019-11-17T15:53:54+5:302019-11-17T15:56:09+5:30
सुन्नी धार्मिक प्रवचन, धार्मिक जनजागृती व मूऐ मुबारक दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भुसावळ, जि.जळगाव : येथील खडका रोड भागात तवक्कल मंजिलजवळ १६ रोजी रात्री सुन्नी धार्मिक प्रवचन, धार्मिक जनजागृती व मूऐ मुबारक दर्शन सोहळ्याचे आयोजन रात्री करण्यात आले होते.
यात प्रथम हुजूर यांचे मुऐ मुबारक शरीफचे दुपारी महिलांसाठी, तर सायंकाळी महिला भाविकांसाठी दर्शनार्थ ठेवण्यात आले होते. रात्री हाफीजे हदीस मुफ्ती मो.रहेमत मिस्बाही मुंबई, हाफीज सै.मो. नुरआलम, शाहीरे इस्लाम मकबुल हुसेन शायदा कोलकाता, हाजी रियाजोद्दीन सिद्दीकी गाजीपूर, मुनव्वर अली रिजवी मुंबई, हाफीज शाहबुद्दीन गाजीपूर, मौलाना अब्दुल मुस्तफा आदी धर्मगुरुंनी आपले विचार परखडपणे मांडले.
या धार्मिक कार्यक्रमास हाफीज कमरूद्दिन रिजवी, हाफीज मोहम्मद जावेद सिद्दिकी, मौलाना मो.सलीम मुंबई, मो.अमानतुल्ला युसूफ, हाफीज मो.सुलतान रजा, हाफिज मो.अखलाक अहमद रिजवी, मौलाना अब्दुल हकीम नईमी, मो.तैफुर रजा, हाफीज सै. मो.याकुब रिजवी, मो.मुस्तकीम कादरी, हाफीज गुलाम सरवर रिजवी, मौलाना जियाऊल मुस्तफा रिजवी,मौलाना मो.रेहान रजा, हाफीज मो. शफीयोद्दीन रिजवी, हाफीज रईस अहमद शहा नक्शबंदी, कलीम अहमद रिजवी, हाफीज गुलाम जिलानी रिजवी, मौलाना मो.शाहिद नुरी, मौलाना कमर हाषमी रिजवी, हाफीज लुकमान खान, हाफीज लुकमान खान रिजवी कारी यांच्यासह अनेक सुन्नी मुस्लीम धर्मगुरुंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सर्व प्रमुख धर्मगुरूंनी सुन्नी जमातवर आधारित आपले विचार मांडले तर काहींनी धर्मगुरुंचा प्रत्येकाने सन्मान करायला हवे, असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक तवक्कल इंजिनीअरिंग कन्स्ट्रक्शनचे संचालक अफजल अहमद सिद्दिकी यांच्यासह मित्र परिवार व सुन्नी जमातमधील सदस्यांनी परिश्रम घेतले. दर्शन सोहळा व प्रवचनास अनेक मुस्लीम भाविक उपस्थित होते.