कचरामुक्तीची जबाबदारी सर्वांची, अमळनेर येथे कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:35 PM2019-07-01T21:35:37+5:302019-07-01T21:36:20+5:30
अमळनेर : स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहर स्वच्छ, सुंदर व्हावे यासाठी नगरपपालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापनावर एकदिवसीय कार्यशाळाचे आयोजन इंदिरा गांधी ...
अमळनेर : स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहर स्वच्छ, सुंदर व्हावे यासाठी नगरपपालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापनावर एकदिवसीय कार्यशाळाचे आयोजन इंदिरा गांधी भवन येथे ३० जून रोेजी करण्यात आले. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी विघटनशील व अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर व विक्री याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. याअंतर्गत अमळनेर शहर स्वच्छ व कचरामुक्त करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. यासाठी पालिकेला त्यात सातत्य टिकविणे आवश्यक असल्याचे बाविस्कर म्हणाल्या. पर्यावरणाचा -हास होऊ नये याकरिता कच-याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शहरात प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद केला असून शहर प्लास्टीकमुक्त घोषीत केले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या व्यावसायिक, नागरिकांना दंड करण्यात आलेला आहे. मात्र, काही दुकानदार ५० मॅक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या विकताना दिसत आहेत. अशा दुकानदारांनी प्लास्टीक पिशव्या आपल्याजवळ बाळगू नयेत, तसेच दुकानातून निर्माण होणारा कचरा कुठेही उघड्यावर टाकू नये. शहर कचरामुक्त करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, ेअसे त्या म्हणाल्या.
सूत्रसंचालन युवराज चव्हाण यांनी केले. विद्युत पर्यवेक्षक प्रशांत ठाकूर, आरोग्य निरीक्षक संतोष बि-हाडे, अरविंद कदम, अनिल बेडवाल, शहर समन्वयक गणेश गढरी, विजय सपकाळे, फय्याज शेख, कु.जया सरदार, समाधान बच्छाव, मच्ंिछद्र संदानशिव आदी उपस्थित होते. यावेळी संतोष बि-हाडे यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.