विकास कामे वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:21 AM2021-08-28T04:21:21+5:302021-08-28T04:21:21+5:30

जळगाव : जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चाचे नियोजन करताना प्रशासकीय यंत्रणानी एकमेकांमध्ये समन्वय राखून विकासात्मक कामांचे नियोजन ...

Responsibility for timely completion of development works rests with the department head | विकास कामे वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर

विकास कामे वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर

Next

जळगाव : जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या खर्चाचे नियोजन करताना प्रशासकीय यंत्रणानी एकमेकांमध्ये समन्वय राखून विकासात्मक कामांचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी दिले. कामे करताना ती विहित वेळेत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची राहणार असल्याने त्यानुसार कामांचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक पद्मनाभा, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

कामांचे फोटो अपलोड करा

जिल्हा नियोजनच्या निधीतून मागील वर्षी केलेल्या कामांचे फोटो जीपीएस प्रणालीवर अपलोड करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या. चालू वर्षी कामाचे नियोजन करताना त्या कामाची आवश्यकता, उपयोगिता व जनहित लक्षात घेऊनच प्रस्ताव सादर करावेत, विकास कामे सुचविताना बहुउपयोगी कामांवर भर देण्यात यावा तसेच दोन यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. ज्या विभागांना कामांसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे, त्यांनी तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन वर्क ऑर्डर द्यावी तसेच निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. त्याचप्रमाणे यंत्रणांनी आयपास प्रणालीचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जि.प.ने गेल्या वर्षाचा निधी पूर्ण खर्च करावा

जिल्हा परिषदेला मागील आर्थिक वर्षात देण्यात आलेला निधी यावर्षी पूर्ण खर्च होणे आवश्यक आहे. मागील वर्षीच्या स्पीलमधून करावयाची कामे तातडीने पूर्ण होतील याकडे संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांनी लक्ष देण्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले.

Web Title: Responsibility for timely completion of development works rests with the department head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.