संयमातून निर्मल आरोग्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:46 PM2020-04-14T23:46:34+5:302020-04-14T23:47:02+5:30

आज आपण बघत आहोत संपूर्ण जगभर कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. यामागे अनेकानेक कारणे सांगितली जात आहेत. ही ...

From restraint to pure health | संयमातून निर्मल आरोग्याकडे

संयमातून निर्मल आरोग्याकडे

Next

आज आपण बघत आहोत संपूर्ण जगभर कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. यामागे अनेकानेक कारणे सांगितली जात आहेत. ही सर्व बाह्य कारणे झालीत. या मधील काही सत्य असेलही.परंतु यामागील मूळ कारण म्हणजेच अंतरंग कारण वेगळे आहे. मूळ कारण स्वत: भगवंत भगवद् गीतेत सांगत आहेत. जेव्हा आपण प्रमाणित शास्त्रांची अवहेलना करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कार्य करतो तर त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होऊच शकत नाही. लहरीप्रमाणे कर्म केल्याने दु:खमय आणि भययुक्त वातावरण निर्माण होते. आपण प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करत आहोत. हे मूळ कारण आहे. आपण जेवढे प्रकृतीचे शोषण करू तेवढंच ही प्रकृती आपल्याला बांधून ठेवेल. निसर्ग कोरोनाच्या रुपात आपल्याला सावध करीत आहे. आज कारोना सारख्या महामारीवर विजय मिळवण्यासाठी संपूर्ण विश्व एकजूट झाले आहे. अनेकानेक योजना आखल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी संपूर्ण राष्ट्राला संदेश दिला. त्यात ते सांगत होते आपण एकजूट होऊन या कोरोनावर विजय प्राप्त करावयाचा आहे. तर आपण एकजूट होऊन नक्की च भारत सरकारकडून येणाऱ्या आदेशांचे पालन अगदी’ तत्परतेने केले पाहिजे. आपलं लक्ष त्यांनी सांगितलेल्या दोन मुद्याकडे आकर्षित करत आहे. एक म्हणजे संकल्प आणि दुसरा म्हणजे संयम.
यात आपण सर्वांनी एक संकल्प जरूर केला पाहिजे मी कधीच मांस खाणार नाही, कोणाला माझ्यामुळे त्रास होईल असे वागणार नाही. शास्त्रांच्या तसेच शासनाच्या नियमांचे पालन करेल. कर्माचा सिद्धांत आहे आपण आता दुसºयासोबत जसे वागू तशीच वर्तणूक आपल्यासोबत भविष्यात होईल. आपण आतातरी सावध व्हायला हवे, असा सर्वांनी संकल्प करावा आणि याचप्रकारे शास्त्रांची मर्यादासुध्दा आपण ओलांडणार नाही.
आज संपूर्ण जगभर योग खूप प्रसिद्ध आहे. परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की प्रामाणिक योग पद्धतीचा मूळ आधार आहे तो म्हणजे आत्मसंयम! योगाची सुरुवातच यम आणि नियम पासून होते आपण आज आसन आणि प्राणायाम तर करत आहोत. परंतु यम आणि नियम याकडे दुर्लक्ष करत आहोत तर आपण प्रामाणिक शास्त्राच्या नियमांचे पालन करावे आणि आपल्या अध्यात्मिक चेतनेचा विकास करताना भौतिकरीत्याही स्वस्थ आणि तंदुरुस्त रहा.
- चैतन्य जीवनदास,
अध्यक्ष, इस्कॉन.

Web Title: From restraint to pure health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव