निर्बंधामुळे कृउबामध्ये धान्याची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:01+5:302021-05-08T04:16:01+5:30
खान्देश पानासाठी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान धान्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला आहे. दुकानांच्या ...
खान्देश पानासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान धान्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला आहे. दुकानांच्या वेळा मर्यादीत असल्याने या काळात धान्य विक्री पूर्णपणे होत नसल्याने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची आवक १० ते १५ टक्क्यावर आली आहे. त्यात धान्याचे भावही कमी होत आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला व व्यवसायांवर परिणाम होणे सुरु झाले. कोरोना नियंत्रणासाठी जनता कर्फ्यू, तीन दिवस कडक निर्बंध असे नियम घालून देण्यात आले. तरीदेखील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने अखेर ‘ब्रेक द चेन’ लागू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा सकाळी सात ते ११ या वेळेतच उघड्या ठेवण्याची अट घालण्यात आली. यामध्ये बाजार समितीमध्येदेखील याच वेळेत व्यवहार होत आहे.
बाजार समितीतील व्यवहारांवरदेखील वेळेच्या मर्यादा आल्याने ११ वाजेनंतर धान्य खरेदीदेखील केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल सकाळी ११ वाजेनंतर आणल्यास त्यांना तो परत न्यावा लागत आहे. त्यामुळे सकाळी चार तासात जेवढा माल खरेदी होईल तेवढाच माल बाजार समितीमध्ये उपलब्ध राहत आहे. परिणामी शेतकरीदेखील सकाळी उशीर झाल्यास माल आणत नसून दुसऱ्या दिवशी तो आणतात. दररोज अशा प्रकारे शेतकऱ्यांची संख्या कमी होत असल्याने आवकही घटत आहे.
खरीप हंगाम तोंडावर येत असल्याने शेती कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे घरात असलेला शेती माल विकणेही आवश्यक असल्याने शेतकरी तो विक्रीचा प्रयत्न करीत आहे. त्यात दुकानांच्या वेळा मर्यादीत असल्याने माल नेल्यानंतर जो भाव मिळेल त्या भावात त्याची विक्री करीत आहे.
धान्य खरेदीचा हा हंगाम असून या काळात वर्षभराचे धान्य खरेदी करून ठेवले जाते. गेल्या महिन्यात गव्हाचे भाव वाढले होते. त्यानंतर आता निर्बंधादरम्यान आवक कमी झालेली असताना भाव देखील कमी झाले आहे. गव्हाचे भाव दोनशे रुपये प्रति क्विंटलने कमी झाले आहे.
दररोज होणारी आवक (क्विंटल मध्ये)
धान्य - आवक -भाव
गहू -१५० ते २००- १८०० ते २३००
ज्वारी -६४ -१२०० ते २०००
दादर -५० - १४०० ते २२००
लाल हरभरा -२०० -४८०० ते ४९००
जाड हरभरा- १०० - ८६०० ते ८७००