बारावी परीक्षेचा निकाल :यंदाही मुलींनी मारली निकालात बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:31 PM2019-05-28T22:31:24+5:302019-05-28T22:31:53+5:30

अमळनेर व रावेर तालुक्याचा सर्वाधिक निकाल

Result of 12th examination: This year, girls got beaten up | बारावी परीक्षेचा निकाल :यंदाही मुलींनी मारली निकालात बाजी

बारावी परीक्षेचा निकाल :यंदाही मुलींनी मारली निकालात बाजी

Next


जळगाव : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात यंदादेखील मुलांंच्या तुुलनेत मुुलींनी बाजी मारली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर ९३.६० व रावेर तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांचा ९३.३६ टक्के निकाल लागला.
इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील ४८ हजार ६९० विद्यार्थी बसलेले होते. त्यातील नियमित विद्यार्थी ४८ हजार ६१८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी २४ हजार १७४ विद्यार्थी तर १७ हजार ९३४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ही ८४.२० टक्के तर विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी ही ९०.०८ टक्के इतकी आहे.
अमळनेर व रावेर तालुक्याचा सर्वाधिक निकाल
बारावीच्या निकालात अमळनेर तालुक्याचा ९३.६० तर रावेर तालुक्याचा ९३.३६ टक्के निकाल लागला. त्या खालोखाल भडगाव ९२.२७, यावल ९१.४३, धरणगाव तालुक्याचा निकाल ९०.७५ टक्के निकाल लागला आहे.
रावेर, धरणगाव, अमळनेर, भडगाव तालुक्यात मुलींचे वर्चस्व
रावेर, धरणगाव, अमळनेर, भडगाव तालुक्यातील निकालावर मुलींचे वर्चस्व राहिले.
या तालुक्यात मुलींचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जळगाव शहरात देखील मुलींच्या निकालाची टक्केवारी ८६.९० इतकी राहिली. सर्वच तालुक्यांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी
तालुका विद्यार्थी विद्यार्थीनी
अमळनेर 2163 1348
भुसावळ 2031 1662
बोदवड 241 322
भडगाव 1454 934
चाळीसगाव 1719 1312
चोपडा 1977 1405
धरणगाव 1046 603
एरंडोल 652 531
जळगाव 826 404
जामनेर 1290 1287
मुक्ताईनगर 679 664
पारोळा 1481 896
पाचोरा 1507 1223
रावेर 1831 1318
यावल 2026 1292
जळगाव शहर 3251 2754
एकुण 24174 17934

Web Title: Result of 12th examination: This year, girls got beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.