अमळनेरच्या नगराध्यक्षांसह 23 नगरसेवक अपात्र, जिल्हाधिका-यांचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:45 PM2018-01-29T23:45:39+5:302018-01-29T23:50:31+5:30

अतिक्रमण हटावला स्थगिती देणे भोवले

Result of 23 corporators ineligible | अमळनेरच्या नगराध्यक्षांसह 23 नगरसेवक अपात्र, जिल्हाधिका-यांचा निकाल

अमळनेरच्या नगराध्यक्षांसह 23 नगरसेवक अपात्र, जिल्हाधिका-यांचा निकाल

Next
ठळक मुद्देअतिक्रमण हटाव रोखण्याचा सभेतच केला ठरावजिल्हाधिका-यांकडे केली होती अपात्रतेची मागणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29- अमळनेर येथील अतिक्रमण हटाव मोहिम थांबवून त्यांना संरक्षण देण्याचा पालिका सभेत ठराव करणा:या नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांच्यासह 23 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निकाल जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  सोमवार, 29 जानेवारी रोजी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनीदिली. या निकालाने  राजकीय वतरुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या निकालाबाबत जिल्हा प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात होती. 

अतिक्रमण हटाव रोखण्याचा सभेतच केला ठराव
अमळनेर नगरपालिकाचे  मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांनी अतिक्रमण हटावची मोहिम सुरू करुन अतिक्रमण करणा:यांना नोटीसा दिल्या होत्या. ही कारवाई रोखण्याचा ठराव नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व इतर 22 नगरसेवकांनी पालिका सभेत केला होता.

जिल्हाधिका-यांकडे केली होती अपात्रतेची मागणी
नगरपालिकेत सत्ताधारी गटाने सत्तेचा गैरवापर करीत अतिक्रमण हटाव मोहीम स्थगितेचा ठराव केला व कायद्याचे उल्लंघन केल्याने आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते  प्रवीणकुमार पाठक, उपनेत्या सविता संदानशिव, प्रतोद सलीम शेख यांनी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व इतर 22 नगरसेवकांविरोधात 12 जून 2017 रोजी जिल्हाधिका:यांकडे ठराव दाखल करून तत्काळ अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी केली होती. 

23 सदस्यांच्या अपात्रतेने पालिकेला खिंडार
हे प्रकरण  जिल्हाधिका-यांसमोर आल्यानंतर साडेसात महिन्यांपासून या बाबतचा निर्णय रखडलेला होता.  अखेर सोमवारी या प्रकरणाचा जिल्हाधिका:यांनी निर्णय दिला. यात त्यांनी सर्व तथ्ये तपासून अतिक्रमणास अडथळे आणणा:या पदाधिका:यांना अपात्र ठरविणा:या कलमाचा वापर करुन नगराध्यक्षांसह नगरसेवकांना अपात्र ठरविणारा निकाल 29 जानेवारी रोजी दिला. त्यामुळे 39 सदस्य संख्या असलेल्या अमळनेर पालिकेतील तब्बल 23 सदस्य अपात्र ठरल्याने पालिकेला  खिंडारच पडल्याचे बोलले जात आहे. 

अपात्र ठरलेले नगरसेवक
नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, नगरसेवक शीतल राजेंद्र यादव, नूतन महेश पाटील, संतोष भगवान पाटील, सुरेश आत्माराम पाटील, नरेंद्र रामभाऊ संदानशिव, निशातबानो अनीस खान कुरेशी, मनोज भाऊराव पाटील, गायत्री दीपक पाटील, अॅड. चेतना य™ोश्वर पाटील, विवेक भीमराव पाटील, निशांत राजेंद्र अग्रवाल, संजय आनंदा मराठे, चंद्रकला अशोक साळुंखे, कुमाररामकृष्ण बापुराव पाटील, राजेश शिवाजी पाटील, कमलबाई पितांबर पाटील, रत्नमाला साखरलाल माळी, रत्ना प्रकाश महाजन, विनोद रामचंद्र लांबोळे, प्रवीण साहेबराव पाटील, सलीम शेख फत्तू शेख, अभिषेक विनोद पाटील. 

काय आहे निकाल
अजर्दारांचा अर्ज मंजूर करण्यात येऊन नगराध्यक्ष व 22 नगरसेवकांना  नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965चे कलम 44 (1)(ई) अन्वये आदेश दिल्याच्या दिनांकापासून उर्वरित पदावधीसाठी अनर्ह (अपात्र) ठरविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. निकालाविरोधात अपील करायचे असल्यास ते राज्य शासनाकडे 15 दिवसात दाखल करता येणार आहे. 

जिल्हाधिका:यांचा शोधाशोध
या निकालानंतर निकाल मिळविण्यासाठी अपात्र ठरलेल्यांचे वकील व इतर मंडळींनी तसेच पत्रकारांनी जिल्हाधिका:यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात नव्हते व भ्रमणध्वनीवरही संपर्क होऊ शकला नाही. नगरपालिका शाखेतूनही जिल्हाधिका:यांनी दिलेल्या निकालाबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्या, 30 जानेवारी रोजी या बाबत माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले जात होते. 

आरोपांनी ढवळून निघाले प्रकरण
 अमळनेर येथील भाजपाच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील आणि 23 नगरसेवकांना अपत्रता प्रकरणातून वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने हा निकाल सध्या राखीव ठेवला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पत्रपरिषद घेऊन  केला होता. इतकेच नव्हे राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सत्तेचा लाभ मिळविण्यासाठी प}ी पुष्पलता पाटील या नगराध्यक्षा असतानाही भाजपात पाठविले व आपण स्वत: राष्ट्रवादीतच राहिल्याचे अॅड. पाटील म्हणाले होते. मात्र शहरातील अतिक्रमणांना स्थगिती दिल्याच्या प्रकरणात आमदार शिरीष चौधरी गटाने जिल्हाधिका:यांकडे नगराध्यक्षा व 22 नगरसेवक अपात्र करावे अशी मागणी केल्याने या प्रकरणात अभय मिळवून देण्याचा शब्द स्थानिक भाजपा नेत्यांकडून मिळाल्याने साहेबराव पाटील हे भाजपात गेले, असाही आरोप डॉ.सतीश पाटील यांनी केला होता. जिल्हाधिका:यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या प्रकरणात न ऐकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागल्याचे सांगून  काही दिवसांपूर्वी जाहीर होणारा हा निकाल राखून ठेवला गेल्याचा आरोप डॉ. सतीश पाटील यांनी केला होता. 

Web Title: Result of 23 corporators ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.