राममंदिर मुद्याचा परिणाम येत्या निवडणुकांमध्ये भाजपावर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:25 PM2018-05-13T17:25:37+5:302018-05-13T17:25:37+5:30
हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांचे मत
Next
ठळक मुद्देतोगडिया यांना हटविणे खटकणारी बाबलोकमान्य टिळक यांचा अनादर करणा:यांवर कारवाई करा अन्यथा देशभर तीव्र आंदोलन
ज गाव : राममंदिर हा सर्व हिंदू धर्मियांच्या अस्मितेचा विषय असून भाजापा सरकारने गेल्या निवडणुकीत हे मंदिर उभारण्याचे आश्वासन देवूनही कार्यवाही न केल्याने याचा खेद आहे. आता वर्षभरातही काहीच केले नाही तर याचा परिणाम येत्या निवडणुकीत भाजपावर होवू शकतो, असे मत हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले. शनिवारी दुपारी पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. गोविंद तिवारी, विजय पाटील यांचीही उपस्थिती होती.तोगडिया यांना हटविणे खटकणारी बाबराम मंदिराच्या प्रश्नावर प्रवीण तोगडिया यांना विहिपच्या पदावरुन दूर व्हावे लागले, ही बाबही खटकणारी आहे. आम्ही राममंदिर उभारणाच्या विचारांशी ठाम असून या विचाराचे जेही समर्थन करतील व आग्रह धरतील त्यांच्यासोबत आम्ही कायम आहोत, असेही घनवट यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.लोकमान्य टिळक यांचा अनादर करणा:यांवर कारवाई करा अन्यथा देशभर तीव्र आंदोलनराजस्थान मधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘दहशतवादाचे जनक’ असा उल्लेख केला आहे. ही बाब अवमानकारक असून हा उल्लेख पुस्तकातून तातडीने वगळून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी उपस्थित तिघा पदाधिका:यांनी केली. अशा प्रकारे राष्ट्रपुरूषांची प्रतिमा मलीन करण्याचे काम ब:याचदा होताना दिसते. हे एक षडयंत्र असून याची गंभीरपणे दखल न घेतल्यास देशभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही पत्रपरिषदेत देण्यात आला.