१२० कोटी रुपयांच्या केटामाईन तस्करी प्रकरणाचा आज निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:19 AM2019-04-26T11:19:22+5:302019-04-26T11:19:24+5:30
तब्बल १२० कोटी रुपयांच्या केटामाईन (अंमलीपदार्थ) तस्करी प्रकरणी शुक्रवार २६ रोजी न्यायालय आरोपींना शिक्षा सुनावणार आहे.
Next
जळगाव : तब्बल १२० कोटी रुपयांच्या केटामाईन (अंमलीपदार्थ) तस्करी प्रकरणी शुक्रवार २६ रोजी न्यायालय आरोपींना शिक्षा सुनावणार आहे. न्या. एस. जी. ठुबे यांनी यातील सात आरोपींना दोषी ठरविले आहे. वरुण कुमार तिवारी (४२, रा.विक्रोळी, मुंबई), जी. श्रीनिवास राव (५२, रा.पवई, मुंबई), नितीन चिंचोले (५६, रा. जळगाव), विकास पुरी (४८, पवई, मुंबई), खेमा मधुकर झोपे (४७,रा.अंबरनाथ, जि.ठाणे), रजनीश ठाकूर (५०, रा. सिकंदराबाद, आंध्रप्रदेश) व एस.एम.सेन्थीलकुमार ( ४०, रा.चेन्नई) या सात जणांना दोषी धरण्यात आले आहे. या खटल्यात पाच जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे. यात ४४ साक्षीदार तपासण्यात आले.