९८ टक्के पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:27+5:302021-06-09T04:21:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १८ मे ते ३ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यातील सुमारे ९८ टक्के अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा निकाल हा विद्यापीठाच्या संकेतस्थळारवर जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा १८ मे रोजी प्रांरभ झाल्या होत्या. नंतर ३ जूनला ह्या परीक्षा संपल्या. जस-जसे परीक्षा होत होत्या, तस-तसे विद्यापीठाकडून एक ते दोन दिवसात निकाल जाहीर केले जात होते. सुमारे ९८ टक्के अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर करण्यात आले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.बी.पी.पाटील यांनी दिली. तर एम.ई. एम.टेक, एम.फार्म या अभ्यासक्रमाचे निकाल अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत. लवकरच या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले जाणार आहे.
उन्हाळी परीक्षा आजपासून ; पहिल्या दिवशी तेराशे परीक्षार्थी
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील उन्हाळी सत्रातील परीक्षांना मंगळवार, ८ जूनपासून सुरूवात होत आहे. त्यात बी.एस.डब्ल्यू. (सत्र १,३,४,५ व ६), बी.ए. बी.सी.जे. (सत्र १,३,४,५ व ६), बी.पी.ई. (सर्व सत्र), बी.एफ.ए. (वार्षिक), डी.पी.ए. (सत्र १,३,४), बी.ए. ॲडीशनल संगीत (वार्षिक), लॉ. (सत्र १, नियमित व पुर्नपरीक्षार्थी सत्र १) या परीक्षांचा समावेश आहे. तर १५ जून, २०२१ पासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. (सत्र १,३,४,५ व ६) या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होतील. दरम्यान, मंगळवारी परिक्षेच्या पहिल्या दिवशी तेराशे परीक्षार्थी ऑनलाइन पेपर देतील.