जळगाव जिल्ह्यात केरोसीन विक्री पुन्हा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 02:55 PM2018-12-24T14:55:37+5:302018-12-24T14:57:00+5:30

जळगाव जिल्हा ‘केरोसीन मुक्त’ करण्यात आला असून, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची केरोसीनसाठी होरपळ होत आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनतेसाठी आवश्यक असलेली केरोसीनची विक्री पुन्हा सुरू करण्यात यावी किंवा परवानाधारकांना मानधन व वेतन रोजगार मिळावा, अशी मागणी मुक्ताईनगर व जामनेर तालुक्यातील हॉकर्स व किरकोळ रॉकेल परवानाधारक संघटनेकडून करण्यात आली आहे. तसे निवेदन माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.

Resume kerosene sale in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात केरोसीन विक्री पुन्हा सुरू करा

जळगाव जिल्ह्यात केरोसीन विक्री पुन्हा सुरू करा

Next
ठळक मुद्देमुक्ताईनगर येथे तालुका रॉकेल परवानाधारक संघटनेचे आमदार एकनाथराव खडसेंना साकडेजिल्हा केरोसीनमुक्त केल्याने अंत्यविधीसह अनेक ठिकाणी होतात हाल

मुक्ताईनगर, जि.जळगाव : जिल्हा ‘केरोसीन मुक्त’ करण्यात आला असून, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची केरोसीनसाठी होरपळ होत आहे. अशा परिस्थितीत सामान्य जनतेसाठी आवश्यक असलेली केरोसीनची विक्री पुन्हा सुरू करण्यात यावी किंवा परवानाधारकांना मानधन व वेतन रोजगार मिळावा, अशी मागणी मुक्ताईनगर व जामनेर तालुक्यातील हॉकर्स व किरकोळ रॉकेल परवानाधारक संघटनेकडून करण्यात आली आहे. तसे निवेदन माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासन निर्णयानुसार हमीपत्र आवश्यक केल्याने जळगाव जिल्हा आॅक्टोबर २०१८ पासून केरोसीन मुक्त झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. सामान्य जनतेसाठी रॉकेल हे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काही भागात विजेची समस्या कायम आहे. अशावेळी रॉकेलचा सहारा मिळतो. कंदिलातील इंधन म्हणूनही रॉकेलचा वापर ग्रामीण भागात होतो. काही ठिकाणी तर अंत्यसंस्कार करतानासुद्धा रॉकेलची आवश्यकता भासते. अशावेळी नागरिक परवानाधारक रॉकेल विक्रेत्यांकडे रॉकेलची मागणी करतात. मात्र रॉकेल परवानाधारकांकडे नसल्यामुळे नागरिकांचा परवानाधारकांच्या बाबतीत चुकीचा ग्रह होतो. शासनाने फ्रीसेल केरोसीनची विक्री सुरु केली आहे, मात्र त्याचे दर हे नियमित रॉकेल विक्रीपेक्षा जास्त असल्यामुळे ग्राहक असे रॉकेल घ्यायला तयार नाही. तसेच त्या विक्रीवरील कमिशनसुद्धा अत्यल्प असल्यामुळे परवानाधारकांनासुद्धा परवडत नाही. मागील ३० ते ३५ वर्षांपासून परवानाधारक आपल्या कुटुंबाचे पालन पोषण रेशनकार्डधारकांना रॉकेल वाटप करून करत आले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील वयोवृद्धांचे औषधोपचार व मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न याच माध्यमातून केले जाते. मात्र शासनाने जिल्ह्यातील रॉकेल विक्रीच बंद केल्यामुळे आज रोजी रॉकेल विक्रेत्यांच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात केवळ पुणे व जळगाव जिल्ह्यातच परवानाधारक विक्रेत्यांकडून रॉकेल विक्री बंद आहे. उर्वरित सर्वच जिल्ह्यात सदर विक्री सुरू आहे. त्यामुळे सदर विक्री पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे पदाधिकारी एस. एस. ब्रह्मक्षत्रीय, मधुकर गोसावी, भागवत राठोड, संतोष खोरखेडे, सुभाष चिंचोले, के. एस. पाटील, नवल राठी, एस .के. पाटील, दिनकर पाटील, निमखेडी खुर्द सोसायटी, चांगदेव सोसायटी, घोडसगाव सोसायटी, सु. द. घाडगे, प्रभाकर सुशीर, अनिल खिरळकर, बाळू बोंडे, इंदुबाई पाटील, हमीद, पानपाटील, पोहेकर, सागर राठी, अंतुर्ली सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Resume kerosene sale in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.