सेवानिवृत्तांचा पेन्शन विक्री योजना दावा प्रश्न अखेर लागला मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 01:19 AM2020-11-04T01:19:24+5:302020-11-04T01:20:37+5:30

नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन विक्री योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला दावा अखेर मार्गी लागला आहे.

Retirement pension sale plan claims issue finally settled | सेवानिवृत्तांचा पेन्शन विक्री योजना दावा प्रश्न अखेर लागला मार्गी

सेवानिवृत्तांचा पेन्शन विक्री योजना दावा प्रश्न अखेर लागला मार्गी

Next
ठळक मुद्देलाभामुळे दिवाळी आता होणार गोडसेवानिवृत्तांनी व्यक्त केले समाधान

भुसावळ : नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शन विक्री योजनेअंतर्गत प्रलंबित असलेला दावा अखेर मार्गी लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या रक्कम मिळण्यास हिरवी झेंडी दाखवली आहे. यासाठी नगराध्यक्ष रमण भोळेंसह नगरसेवकांनी पेन्शनर असोसिएशनच्या सदस्यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने सहकार्याची भूमिका ठेवली होती.
दिवाळीपूर्वी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मिळालेल्या लाभामुळे दिवाळी आता गोड होणार आहे.
नगर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या पेन्शन विक्री योजनेअंतर्गत शासनाशी १९ वर्षापासून लढा सुरू होता. अखेर यात कर्मचार्‍यांना लढ्यात यश मिळाले असून दोन महिन्यात २४ कर्मचाऱ्यांना २४ लाखांचे लाभ यातून मिळाले. एकूण १९७ कर्मचाऱ्यांची यादी होती. टप्पाटप्प्यांने यादीतील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात पालिका प्रशासनातर्फे १२ लाभार्थ्यांना १३ लाख ५३ हजाराचे धनादेश वाटप करण्यात आले, तर ३ नोव्हेंबर रोजी पालिका सभागृहात नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, पालिका शिक्षण सभापती नगरसेवक मुकेश पाटील, ॲड.बोधराज चौधरी, राजेंद्र नाटकर, निक्की बत्रा, दिनेश नेमाडे, वसंत पाटील, गिरीश महाजन, महेंद्रसिंग ठाकूर यांच्या उपस्थितीत ९ कर्मचाऱ्यांना १० लाख ३७ हजाराचे धनादेश वाटप करण्यात आले. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लढ्यात यश मिळाल्याने आहे.

Web Title: Retirement pension sale plan claims issue finally settled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.