निवृत्ती सागर, ज्ञानाचा आगर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:14+5:302021-02-08T04:14:14+5:30

अध्यात्म तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्यास लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्र येतात. आपली भूमी संतांची आहे. १२ ...

Retirement Sea, the Fire of Knowledge ... | निवृत्ती सागर, ज्ञानाचा आगर...

निवृत्ती सागर, ज्ञानाचा आगर...

Next

अध्यात्म

तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्यास लाखोंच्या संख्येने वारकरी एकत्र येतात. आपली भूमी संतांची आहे. १२ वर्षांतून येणारा कुंभमेळा त्र्यंबकेश्वर नाशिक पावनस्थळी भरत असल्याने या नगरीला आध्यात्मिक अधिष्ठान आहे. या तीर्थाला दक्षिण काशी संबोधले जाते. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री निवृत्तीनाथांचे संजीवन समाधीस्थळ आहे. हे वारकरी संप्रदायाचे उगमस्थान व प्रेरणास्थान आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याजवळ गुरुवर्य संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचे समाधीस्थळ आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू होत.

‘धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून, केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, निवृत्तीनाथांचे चरणी,

शरण एका जनार्दनी.’

तीर्थराज त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांनी ज्येष्ठ वद्य १३ शके १२१९ इसवी सन १२९७ ला संतांच्या व पांडुरंगाच्या साक्षीने समाधी घेतली. नुकतीच

१९९७ साली संत निवृत्तीनाथांची सातशेंवी पुण्यतिथी झाली आणि आता त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची वारी कोरोना या महामारीमुळे यावर्षी स्थगित

झाली आहे. वारकऱ्यांवर घरूनच ब्रह्मगिरीला वंदन करून मनोमन प्रदक्षिणा करण्याची वेळ आली आहे. म्हणून नामदेव महाराज वर्णन करतात, ‘वाचे म्हणता गंगा

गंगा, सकल दोष जाती भंगाशी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी, कुषावर्ती करिता //////////स्थान,///////// त्याचे वैकुंठी शहाणे, नाथ म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना.

-ह.भ.प. गोपाळ ढाके, भादली बु.

Web Title: Retirement Sea, the Fire of Knowledge ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.