उपचार घेऊन परतणा:या भुसावळच्या महिलेला ट्रकने चिरडले
By admin | Published: July 8, 2017 11:28 AM2017-07-08T11:28:02+5:302017-07-08T11:28:02+5:30
दुचाकीवरून फेकल्या गेल्याने पती पुंडलिक सुपडू पाटील (वय 55) हे बचावले.
Next
>ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.8 - रुग्णालयात उपचार घेऊन दुचाकीवर पतीसह घराकडे परतणा:या महिलेला भरधाव ट्रकने राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी जळगावनजीक दूरदर्शन टॉवरसमोर चिरडले. या अपघातात भुसावळ येथील सुनीता पुंडलिक पाटील (वय-48) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरून फेकल्या गेल्याने पती पुंडलिक सुपडू पाटील (वय 55) हे बचावले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळाहून फरार झाला़ अपघातानंतर अध्र्या तासासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती़
भुसावळ येथील रहिवासी पुंडलिक सुपडू पाटील (वय-55) हे रेल्वे विभागात हेल्पर म्हणून नोकरीला आह़े पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आह़े हृदयरोगाने ग्रस्त असल्याने पुंडलिक यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत़ उपचारासाठी ते नेहमी भुसावळहून जळगाव ये-जा करत असतात़