आनंदाचे प्रकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:21 PM2019-06-04T12:21:35+5:302019-06-04T12:22:01+5:30

ईदुल फित्र हा आनंदाचा दिवस. सर्व मुस्लिम बांधव आनंदी व उत्साही आहेत. जणू काही त्यांना महिन्याभराच्या मेहनतीचा मोबदला मिळणार ...

Revelations of joy | आनंदाचे प्रकटीकरण

आनंदाचे प्रकटीकरण

Next

ईदुल फित्र हा आनंदाचा दिवस. सर्व मुस्लिम बांधव आनंदी व उत्साही आहेत. जणू काही त्यांना महिन्याभराच्या मेहनतीचा मोबदला मिळणार आहे.
ईदुल फित्र इस्लाम धर्माचा एक महत्वपूर्ण सण आहे. हा एक जागतिक आनंदोत्सव आहे. मुस्लीमांचे प्रमुख दोन सण आहेत. ईदुल फित्र आणि ईदुल अजहा म्हणजे रमजान ईद आणि बकरी ईद. जागतिक प्रत्येक सभ्यतेमध्ये उत्सवांना मोलाचे स्थान आहे. सामाजिक उत्सव साजरे करणे तसेच एकत्रित येऊन प्रकटीकरण करणे ही मानवाची प्रवृत्ती आहे.
ईदुल फित्र म्हणजे फक्त आनंद उत्सव साजरे करणे नसून मानवाच्या वास्तविक जीवनासाठी अनेक सुप्त गुण आहेत.
आपल्या ईश्वराच्या उपासनेचा आदेश आहे. तीस दिवसीय उपासना व ईश्वर स्मरणाच्या अल्लाहकडून मान्यतेचा दिवस आहे. पण या मान्यतेवर अहंकार दाखवायची परवानगी नाही. ईश्वरासमोर नतमस्तक होऊन नेहमीसाठी उपासना आणि आदर अंमलात आणण्याचा दिवस आहे.
जेव्हा कोणी व्यक्ती एका मोठ्या जबाबदारीस पार पाडतो व त्यास आनंद होतो हा मानवाचा स्वभाव धर्म आहे. जेव्हा मुस्लिम लोक रमजान महिन्यातील रोजांचे कर्तव्यपूर्ण करतात तेव्हा त्यांना आत्मसमाधान लाभते.
या आनंदाचे प्रकटीकरण म्हणजे ईदुल फित्र. इस्लामचे प्रेषीत मोहम्मद पैंगबर (स.अ.स.) यांच्या मतानुसार रोजेदारासाठी दोन प्रकारचे आनंद आहेत. एक रोजे या कर्तव्यास पूर्र्ण करून ईदचा आनंद तर दुसरा रोजे पूर्ण केल्याबद्दल अल्लाह कडून मिळणाऱ्या बक्षीसाचा आनंद.
ईदच्या रात्रीला उपासनेची रात्र संबोधले आहे आणि ह्या रात्री (चांदरात) इबादत करणाऱ्यांना मोक्ष आणि क्षमा याची शास्वती आहे. आपल्या आनंदाचा स्वीकार आपल्या ईश्वरासमोर आपली मान नमवून केला जातो.
- काझी मुजम्मिलोद्दीन नदवी, डिपार्टमेन्ट आॅफ इस्लामिक स्टडीज, इकरा एच.जे.थीम कॉलेज, मेहरूण, जळगाव

Web Title: Revelations of joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव