तलाठय़ावर हल्लाप्रकरणी जळगावात महसूल विभागाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:32 PM2018-01-20T12:32:52+5:302018-01-20T12:35:12+5:30

काळ्या फिती लावून काम

Revenue Department's movement in Jalgaon in Jalgaon | तलाठय़ावर हल्लाप्रकरणी जळगावात महसूल विभागाचे आंदोलन

तलाठय़ावर हल्लाप्रकरणी जळगावात महसूल विभागाचे आंदोलन

Next
ठळक मुद्देआज लेखणी बंदतहसीलदार संघटनेतर्फेही निषेध

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20-  वाळू वाहनांवर कारवाई करणा:या पिंगळवाडे ता.अमळनेर येथील तलाठय़ावर जीवघेणा हल्ला झाल्याप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक  करण्याच्या मागणीसाठी व हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना व जिल्हा तलाठी संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 
त्यानुसार शुक्रवार, 19 रोजी काळ्या फिती लावून काम केले. तर शनिवार, 20 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लिपीक व लिपिक संवर्गातील मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन करतील. 
तरी देखील मारहाण करणा:या वाळू माफियांविरूद्ध कडक कारवाई न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. आरोपींमध्ये सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी असल्याने अटक करण्यास टाळाटाळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलन लांबल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, सरचिटणीस अमोल जुमडे,  उपाध्यक्ष रविंद्र माळी, कोषाध्यक्ष सुयोग कुलकर्णी यांनी दिला आहे. 
तहसीलदार संघटनेतर्फेही निषेध
अवैध वाळू उपसा करणा:यांकडून भडगाव तहसीलदारांना झालेली धक्काबुक्की तसेच पिंगळवाडे तलाठी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात निषेध करण्यात आला आहे. अनधिकृत वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसीलदारांच्या अधिपत्याखाली पथके नेमली आहेत. मात्र त्यांच्यावर या वाळू माफियांकडून हल्ले होण्याच्या घटनात वाढ होत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. 

Web Title: Revenue Department's movement in Jalgaon in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.