मुक्ताईनगर तालुक्यात बारा तलाठय़ांवर महसूलचा गाडा

By Admin | Published: June 15, 2017 05:40 PM2017-06-15T17:40:10+5:302017-06-15T17:40:10+5:30

एका तलाठीकडे आठ गावांचा कारभार आहे.

Revenue Revenue on twelve Dakshitas in Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यात बारा तलाठय़ांवर महसूलचा गाडा

मुक्ताईनगर तालुक्यात बारा तलाठय़ांवर महसूलचा गाडा

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर, जि.  जळगाव, दि. 15 -  मुक्ताईनगर तालुक्यातील 81 गावांकरीता 23 सजेवर 24 तलाठय़ांची पदस्थापना असताना अवघ्या 12 तलाठी कर्मचा:यांवर कामकाज सुरू आहे.  एका तलाठीकडे आठ गावांचा कारभार  आहे. प्रभारी तलाठीबाबत बदलत्या नेमणुकीने दर 15 दिवसाला सज्यावर तलाठी बदल्याचे चित्र असून ऐन खरिपाच्या तोंडावर कामाच्या ताणाने तलाठी तर उतारे दाखल्यांसाठी शेतक:यांची दमछाक होत आहे. अगदी मुक्ताईनगरशहराला देखील कायम नेमणुकीचा तलाठी नाही.
 तालुक्यात एकूण 81 गाव असून 23 सज्याच्या माध्यमातून महसूली  कारभार पार पाडला जातो. यावर चार मंडळ अधिका:यांच्या माध्यमातून कामकाज नियंत्रण केले जाते. अशात 23 सज्याकरीता 24 तलाठी कर्मचा:यांची पदस्थापना असताना येथे आठ जागा रिक्त आहेत. उरलेल्यांपैकी घोडसगाव व कु:हा येथे नेमणूक असलेले दोन तलाठी सतत गैरहजर आहेत तर दोन महिला तलाठी प्रसुती रजेवर आहेत. परिणामी अवघ्या 12 तलाठी कर्मचा:यांवर कामकाज धकविले जात आहे. यामुळे एका तलाठय़ाकडे दोन सजे आणि आठ गावांचा कारभार पार पाडण्याची जबाबदारी आहे. अशात ऐन खरिप हंगामात शेतक:यांना आवश्यक असलेल्या उतारे व दाखल्यांसाठी आपल्या गावाचा नेमका तलाठी कोण येथून शोध सुरू होतो तर प्रभारी तलाठी नेमके मुळ सज्यावर असल्याने तेथर्पयत ही शोध मोहिम कायम असते. एकदा तलाठी सापडलेले की ऑनलाईन उता:याची भानगड मानगुटीवर असते मोठय़ा कौशल्याने हा उतारा व दाखले प्राप्त करून घेण्यास शेतक:याची धावपळ असते.
 दुसरीकडे महसूल प्रशासनाची ही दमछाक दिसून येत आहे. संपुर्ण तालुक्याचा कारभार अवघ्या 12 तलाठी कर्मचा:यांवर यात आठ पुरूष तर चार महिला कर्मचारी परिणामी अतिरिक्त पदभार देण्याबाबत तारेवरची कसरत असते. प्रभारी तलाठी रजेवर गेला तर ही कसरत अधिकच कौशल्याची बनते.
तालुक्यात अपूर्ण तलाठी कर्मचारी संख्या आणि  कामाचा  वाढता ताण यामुळे तलाठी व शेतकरी ही कमालीचे त्रस्त झाले आहेत. अगदी मुक्ताईनगर शहरासारख्या तालुक्याच्या ठिकाणी कायम नेमणुकीचे तलाठी नसल्याने ंिपंप्रीअकराऊत येथील तलाठय़ाकडे मुक्ताईनगर शहराचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. शहरासाठी स्वतंत्र तलाठी नसल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे. शहर आणि तालुक्यात  नुकताच वादळी वारा व जोरदार पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे ही रखडले आहे.

Web Title: Revenue Revenue on twelve Dakshitas in Muktainagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.