राज्याचे मुख्य सचिव घेणार जळगाव जिल्ह्यातील भूसंपादनाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:52 PM2019-12-22T12:52:56+5:302019-12-22T12:53:28+5:30
जळगाव : रेल्वेतर्फे सुरू असलेल्या जळगाव -मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता हे घेणार ...
जळगाव : रेल्वेतर्फे सुरू असलेल्या जळगाव-मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता हे घेणार असून यासाठी मंगळवार, २४ रोजी ते व्हीसीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत. या कामासाठी रेल्वेला जमिनी द्यायला पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील शेतकºयांनी विरोध दर्शविला असून त्यासंदर्भात १९ रोजी ‘लोकमत’ने ‘भूसंपादनाला पाचोरा, चाळीसगाव तालुक्यातील शेतकºयांचा विरोध’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर ही व्हीसी होत आहे.
जळगाव ते मनमाड दरम्यान तिसºया रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोली या साडेअकरा किलो मीटरच्या कामाला यंदा मे महिन्यात सुरुवात केली आहे . मात्र, या साडेअकरा किलो मीटरच्या मार्गावर ज्या शेतकºयांच्या जमिनी येत आहेत. त्या शेतकºयांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यासाठी भूसंपादनाला विरोध दर्शविला आहे. तसेच पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील रेल्वे मार्गालगत असलेल्या शेतकºयानी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार पाचोरा व चाळीसगाव येथील प्रातांधिकाºयांनी या शेतकºयांसोबत चर्चादेखील केली. मात्र, यातून अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. परिणामी रेल्वेच्या हद्दीतच तिसºया लाईनचे काम सुरु असून इतर ठिकाणचे काम रखडले आहे. तसेच दुसरीकडे भादली ते जळगाव या तिसºया रेल्वे मार्गाच्या कामासाठी तरसोद व असोदा येथील बायायतदार व निम बागायतदार शेतकºयांच्या जमिनीला ज्याप्रमाणे भाव दिला आहे त्याप्रमाणे आमच्यादेखील जमिनीला भाव द्यावा, अशी मागणी येथील शेतकरी बांधवांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यावर रेल्वेच्या अधिकाºयांनी महामार्गालगत या जमिनी असल्यामुळे येथील जमिनींना भाव द्यावा लागला असल्याचे शेतकºयांना कळविले आहे. तर शेतकºयांनीही तरसोद-असोदा येथील शेतकºयांप्रमाणे आमच्या जमिनींना मोबदला दिल्यावरच तिसºया मार्गासाठी रेल्वेला जमिनी देणार असल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे.
जिल्ह्यात रेल्वेच्या कामासाठी भूसंपादनाचे असे प्रश्न असल्याने ते सोडविण्यासाठी गेल्या आठवड्यात राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकारी व भुसावळातील रेल्वे अधिकाºयांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. या बैठकीत मुख्य सचिवांनी सध्याच्या बाजार भावानुसार शेतकºयांच्या जमिनी खरेदी करा, शेतकºयांच्या मागणी संदर्भात काही तडजोड करा, तडजोडी नंतरही काही प्रश्न सुटत नसेल तर भूसंपादन कायद्यानुसार या जमिनी ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनाकेल्याहोत्या.
त्यानंतर आता पुन्हा २४ रोजी मुख्य सचिव मेहता हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्याकडून माहिती घेणार आहे. त्यासाठी संबंधित प्रांताधिकाºयांना बोलविण्यात आले आहे.