मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात आढावांचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:07 PM2018-10-07T12:07:57+5:302018-10-07T12:08:38+5:30

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जोरदार तयारी

Reviews of Jalgaon on the backdrop of Chief Minister's visit | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात आढावांचा धडाका

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात आढावांचा धडाका

Next

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, ८ आॅक्टोबर रोजी जळगाव जिल्हा दौºयावर येत असल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जोरदार तयारी केली जात असून शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी विविध खात्यांचा आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत ते ८ रोजी जळगाव जिल्ह्यात येणार आहे. या वेळी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा नियोजन भवनात मुख्यमंत्री फडणवीस हे जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे.
त्यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जि.प., पोलीस प्रशासन, महापालिका, कृषी विभाग, न.पा. प्रशासन, पाटबंधारे विभाग, सा.बां. विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, म्हाडा, जिल्हा शल्य चिकित्सक, वनविभाग, समाजकल्याण, सहकार विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, समाजकल्याण विभाग, आदिवासी प्रकल्प विभाग, अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा नियोजन अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा अग्रणी बँक, भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेचे अवसायक यांच्यासह महसूल विभागातील विविध विभाग प्रमुखांना पत्र देऊन या बैठकीस उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.
या दौºयांतर्गत मुख्यमंत्री जामनेर येथील उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करून विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ नामकरण सोहळ्यास उपस्थित राहणार असून त्यानंतर बंदीस्त नाट्यगृहाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या विषयांशी संबंधित व जिल्ह्यातील विविध योजनांच्या आढावासाठी जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी शनिवारी संपूर्ण आढावा घेतला.
रविवारी कार्यालय सुरू
मुख्यमंत्र्यांच्या दौºयांच्या पार्श्वभूमीवर रविवारीदेखील तयारी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांसह सहकार, कृषी विभाग इत्यादी कार्यालय सुरू राहणार आहेत.

Web Title: Reviews of Jalgaon on the backdrop of Chief Minister's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.