खाजगी दवाखाने बंद ठेवणाऱ्यांचे परवाने रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:00 PM2020-06-04T12:00:40+5:302020-06-04T12:00:53+5:30
आरोग्य मंत्र्यांचे आदेश : २४ तासात अहवाल यायलाच हवेत
जळगाव : खासगी डॉक्टरांनी पीपीई किट परिधान करून रुग्णसेवा दिलीच पाहिजे, अशा काळात ज्या डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवली आहेत़ त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेतच जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे यांना दिले़ खासगी डॉक्टरांनी रुग्णांना कोविडचे प्रमाणपत्र मागण्याची गरजच नाही, अशी माहिती त्यांनी दिली़ जास्तीत जास्त ४८ तासात तपासणी अहवाल यायला हवे, असे त्यांनी बजावले.
तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेला टास्क फोर्स तयार करण्यात येणार असून यासह मुंबईच्या टास्कफोर्सचाही सल्ला घ्या, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली़ काहीही करा, नाशिकला पाठवा, मुंबईला पाठवा, खासगी लॅबकडे पाठवा मात्र, २४ तासात अधिकाधिक ४८ तासात तपासणी अहवाल यायलाच हवे, अशा सक्त सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत़ आयएमएच्या डॉक्टरांनी आठ तास पूर्ण वेळ सेवा देणे अपेक्षित आहे़ केवळ तीन तास सेवेवर होणार नाही, जिल्हाधिकारी नावानीशी आॅर्डर काढतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली़
जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार
स्थानिक पातळीवर तातडीने डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांची भरती करून तातडीने मुलाखती घेऊन त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकाºयांना आहेत़ जे डॉक्टर येत नाहीत त्यांच्यावर मेस्मातंर्गत कारवाईचा निर्णय राज्यपातळीवर झाला आहे़ त्याचे अधिकारही जिल्हाधिकाºयांना आहेत़ त्यांनी त्याचा वापर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले़ कोविड रुग्णालयात सर्व प्राध्यापकांनी सेवा द्यावी, याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले़ कोविड रुग्णालयात सीसीटीव्ह बसवा, दररोज डॉक्टर सेवा देत आहेत की नाही ते तपासा, असेही निर्देश त्यांनी दिले़