किसान महाविद्यालयात क्रांती दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:20 AM2021-08-12T04:20:40+5:302021-08-12T04:20:40+5:30
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे ...
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे होते. सामाजिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील यांनी क्रांतिदिनाचे महत्त्व व खान्देश याविषयी व्याख्यान दिले. उपस्थित प्राध्यापक डॉ. पी. डी. पाटील, प्रा. आर. एस. माळी, प्रा. पी. सी. चौधरी प्रा. डॉ.पी. एस. ठाकरे, प्रा. एस. बी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ.जी. एच. सोनवणे यांनी शिरीष कुमार या बालक्रांतिकारकाचे देशासाठी बलिदान या विषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी भावी पिढीसाठी कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सर्व प्राध्यापकवृंद कोविड नियमांचे पालन करीत कार्यक्रमाला उपस्थित होते.